मातंगपुरी परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन होऊन चार वर्ष उलटले तरी सुद्धा अजून पर्यंत. त्याना राहत असलेल्या जागेचा सात बारा तसेच राहत असलेल्या जागेची नोद भूमी अभिलेख कार्यालयात करण्यात आली नाही. पुनर्वसन नियमा नुसार पुनर्वसित कुटूंबियांना प्रकल्प ग्रस्त प्रमाण पत्र देयाला पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. लखो रुपये खर्चून म्हाडा कॉलनीतील सदनिका बांधण्यात आले सदर सदनिकेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने सदनिकेची पळझळ चारच वर्षात चालू झाली आहे. वारंवार सदनिकेची दुरुस्थी ची मागणी अरुण सुद्धा प्रशासनाचे या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. सदनिकेच्या निकृष्ट दरज्याच्या कामा मुळे मोठी दुर्घटना होनेचे सत्य नाकारता येत नाही.
मातंगपुरीपरिसरात राहत असलेल्याने बरश्या कुटूंबियांचे श्री. गजानन महाराज मंदिरजवळ छोटे व्यवसाय होते. हे व्यवसाय बुळाल्याने त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची होती परंतु त्याकळे जाणीव पूर्वक डोळे झाक करण्यात आली.
पुरुषी बाधित कुटूंबीयांन पुढे रोजगार हा मोठा बिकट प्रश्न आहे या करिता. काही ठोस पाऊले उचलन्याची गरज आहे. मातंगपुरी परिसरातील कुटूंबियानी वेळोवेळी शासन प्रशासनाला सहकार्य केले. त्या मुळे किमान दहा वर्षतरी घर पट्टी, पाणी पट्टी, माफ करावी होती परंतु असे न करता उलट कर लादण्यात आला. मतांगापुरी परिसरात घर असून सुद्धा काही कुटूंबियांना घर मिळाले नाही. ते बे घर झाले या चार वर्षात त्याच्या साठी काहीच करण्यात आले नाही . मातंगपुरी चे पुनर्वसन गावाच्या भायेर केल्याने पुनर्वसित कुटुंबीयांच्या मुलाचे शाळेत जाणे अवघळ होत आहे. शिक्षनाचा कोणताच विचार पुनर्वसन करीत असताना करण्यात आला नाही. प्राथमिक शाळा चालू करू अशे आश्वासन दिले होते. परंतु जाणीव पूर्वक लक्ष देण्यात आले नाही वास्तविक पाहता या कडे शासनाने जातीने लक्ष देयाला पाहिजे होते. परंतु असे होतांना दीसले नाही. साधी अंगणवाडी सुद्धा या चार वर्षात प्रशासन चालू करू शकल नाही.
हे विशेष. म्हाडा कॉलनीत कमालीची दुरावस्था पहावयास मिळते नाल्या, रस्ते, स्ट्रेट लाईट, गार्डन,सभागृह, व्यवस्तीत नसल्याचे केत्येक वेळा निवेदन देऊन ही या कडे प्रशासनाचे
लक्ष नाही.मातंगपूरी येथील दलित कुटूंबियांना गाव कुसा भाहेर कडून देण्याचे हे शळयंत्र आहे. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केला असून आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना पुनर्वसित बाधित कुटूंबियांना घेऊन तीव्र आंदोलन करेल याचे परिणाम शासन प्रशासनाला भोगावे लागतील असा आंदोललात्मक दिला.
त्यावेळीं श्री.गोपाल तायडे,विजय सावळे,विनोद सोनोने, ,मुकेश गवई, रमेश तायडे, गोपाल सु. तायडे. बंटी तायडे राजू तायडे,माणिक सोनोने,किसन तायडे, दानु तायडे,विजय तायडे,सुनील तायडे,विष्णु तायडे,अपसर खान, सायब खा एबराम खान,संतोष मानकर,गजेंद्र मानकर, पवन झोंबाडे,आकाश वारके,शुभम तायडे,पवन मानकर,विवेक तायडे,अशोक तायडे,वसंत सकळकले,ज्ञानेश्वर निंबाळकर,गणेश तायडे,रामदास तायडे,विक्रम तायडे,विलास मानकर,विजय भालेराव,दीपक तायडे,शिवा तायडे,शंकर तायडे,समाधान तायडे,श्रीनाथ तायडे,संतोष माळी,धूर्रव तायडे,विक्रम सौदे, हुशेन खान,अनिलकुमार तायडे,माणिक तायडे,नागेश तायडे,भगवान तायडे,लालाभाला सोनोने,सुनील तायडे, ओम सावळे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 15 March 2022, 10:49 IST