News

आपल्या कष्टकरी मायबापाच्या न्याय हक्कासाठी आता गावा गावात "किसान पुत्र आर्मी" उभारणार.प्रशांत डिक्कर

Updated on 17 January, 2022 1:10 PM IST

आपल्या कष्टकरी मायबापाच्या न्याय हक्कासाठी आता गावा गावात "किसान पुत्र आर्मी" उभारणार.प्रशांत डिक्कर

जळगाव (जा.) : शेतकरी व शेतमजूरांच्या प्रश्नावर एकत्रितपणे लढण्यासाठी गाव तिथे शाखा व घर तिथे स्वाभिमानी हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून दि.१४ जानेवारी रोजी भेंडवळ बु. येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पंसती देत संघटनेमधे काम करण्यासाठी तरुण युवकांचा कल प्रचंड वाढला आहे.

आता पर्यंत नेत्यांसाठी लढलो आता आपल्या नातासाठी लढा. कारण आपल्या ज्या पुर्वजांनी आयुष्यभर नेत्याला खत पाणी घातले तेच नेते आता शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास होऊन बसले आहेत. केवळ स्वताचा आर्थिक फायद्या व खुर्चीसाठी भ्रष्टाचाराच्या व्युवरचनेत गुंतलेले नेते शेतकऱ्यांचे थोडेही भले करु शकत नाहीत हि या मतदारसंघाची वस्तुस्थिती आहे. त्याकरीता देशातील जनतेच्या रक्षणासाठी ज्या प्रमाणे सिमेवर आर्मी काम करते. त्याच धरतिवर उदांत्त हेतुने आपल्या कष्टकरी मायबापाच्या न्याय हक्कासाठी गावा गावात किसान पुत्र आर्मी तयार करून 

शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, जनसामान्य माणसांच्या प्रश्नावर लढण्यासाठी आता सज्ज रहा. असे आवाहन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी भेंडवळ येथे शेतकऱ्यांन सोबत बोलतांना केले. यावेळी भेंडवळ शाखाध्यक्ष शिवदास का.वाघ, उपाध्यक्ष सचिन तळे, सचिव विष्णू सा.वाघ, कार्याध्यक्ष सत्तारशहा, कोषाध्यक्ष गोपाल पाखरे, सदस्य अविनाश वाघ, ज्ञानेश्वर लाहु., शाम वाघ, श्रीकांत सापधारे सह स्वाभिमानीचे युवा अध्यक्ष शुभम वाघ, तालुका कार्याध्यक्ष गणेश वाघ, सरचिटणीस सुरेश थोटे, 

तालुका संघटक सोपान वाघ, विद्यार्थी संघटक अरविंद वाघ, तालुका कोषाध्यक्ष संतोष वाघ यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी गावातिल जेष्ट नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

त्यावेळी आपल्या कष्टकरी मायबापाच्या न्याय हक्कासाठी आता गावा गावात "किसान पुत्र आर्मी" उभारणार असे आवाहन प्रशांत  डिक्कर यांनी केले.

English Summary: Swabhimani branch inaugurated at Bhendwal Bu. In the presence of farmers
Published on: 17 January 2022, 01:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)