स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आता ऊस दरासाठी आंदोलनाची मोठी घोषणा केली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. १ जुलैपासून रायगडावर श्री शिवछत्रपतीच्या समाधीचे दर्शन घेऊन या आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे.
राजू शेट्टी यांनी याबाबत घोषणा केली आहे. शेट्टी म्हणाले, राज्यातील ऊस, कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही घामाचे दाम मिळत नाही.यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
शेतकऱ्यांना दरासाठी संघर्ष करावा लागत आहे. हमीभावासाठी देशव्यापी लढा उभा केला आहे. केंद्र सरकारने अद्यापही हमीभावाचा कायदा लागू केला नाही. सध्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.
जंगल वृद्धीसाठी सीडबॉल निर्मिती कार्यशाळा
यासाठी आता राज्यात ऊसदराच्या संघर्षासाठी मोठा लढा उभा करण्यात येणार आहे. तसेच राज्यभरात खतांचे लिंकिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची मोठी लूट केली जात आहे.
कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावात वाढ, मोदी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या किती झालीय वाढ..
ज्या ठिकाणी लिंकिंगचे प्रकार घडत आहेत. त्या ठिकाणी स्वाभिमानीचे कार्यकर्ते जाऊन खतांचे लिंकिंग हाणून पाडतील, असेही ते म्हणाले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावात वाढ, मोदी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या किती झालीय वाढ..
आता शेतातील स्टार्टर चोरीची चिंताच मिटली, तरुणाने शोधला कायमचा उपाय...
जगातील सर्वात महाग फळ माहितेय? 1 किलोच्या किमतीत चांगली आलिशान कार येईल, जाणून घ्या..
Published on: 08 June 2023, 01:59 IST