पुणे: महा ऑरगॅनिक अॅन्ड रेस्युड्यु फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) अंतर्गत "हेल्दी हार्वेस्ट" या पुण्यातील पहिल्या रिटेल आऊटलेटचे उदघाटन आज ॲम्पी थियटर, मगरपट्टा सिटी पुणे येथे आदरणीय मा. केंद्रीय कृषिमंत्री श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे आयोजन मोर्फाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. युगेंद्रदादा पवार यांनी केले. महा अॉरगॅनीक ॲन्ड रेस्युड्यु फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) यांच्या वतीने हेल्दी हार्वेस्ट या पहिल्या आऊटलेट मध्ये ग्राहकांना राज्याच्या विविध भागातून उत्पादित केलेला विषमुक्त स्वच्छ व ताजा शेती माल कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे.
विषमुक्त शेंद्रिय शेत मालाला मागणी वाढत असून पुण्यात अजून दोन ठिकाणी व त्याच बरोबर मुंबईतही अशी आऊटलेट लवकरच चालू करण्यात येतील व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास शाश्वत बाजारपेठ व अधिकचा बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे श्री. पवार साहेब यांनी जाहीर केले. तसेच हे "हेल्दी हार्वेस्ट" आऊटलेट पाहून युरोपात असल्यासारखे वाटतेय असे साहेब म्हणाले. महाराष्ट्र ऑरगॅनिक ॲण्ड रेसिड्यू फार्मर्स असोसिएशन यांच्या वतीने सेंद्रिय कृषिमाल विक्रीचे हेल्दी हार्वेस्ट ह्या केंद्राचे उद्घाटन मगरपट्टा सिटी हडपसर येथे झाले. एकेकाळी अन्नधान्यावर, आयातीवर अवलंबून असणारा भारत देश आज स्वयंपूर्ण नव्हे तर एक प्रमुख निर्यातदार देश म्हणून पुढे आला आहे.
आता ग्राहकाची गरज, त्याची आवड लक्षात घेऊन शेतमाल पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. उत्पन्नवाढीसाठी व रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा अतिरेक वापर झाला. परंतु त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्याचा परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावर होत असल्याने विषमुक्त सेंद्रिय शेतीमालाची मागणी वाढते आहे. सेंद्रिय मालासाठी आवश्यक असणारी आंतरराष्ट्रीय मानके आहेत. त्यांचे पालन करायला हवे. सरकारने शेतकऱ्यांना असे मार्गदर्शन तसेच तांत्रिक सहाय्य करायला हवे. सेंद्रिय माल खरेदीसाठी बाजारपेठ असावी. याकरिता मुंबईत बैठक बोलावली होती. रिलायन्स, बिग बाजार, परदेशात निर्यात करणाऱ्या कार्पोरेट संस्था यांचे प्रतिनिधी हजर होते. या सर्वांनी मालाचा दर्जा व सातत्य या दोन गोष्टींची हमी दिल्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. दुबईच्या लूलू या संस्थेनेदेखील मोठे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. युरोपमध्येसुद्धा बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. मोर्फा संघटनादेखील तयार झाली आहे. आता या संस्थेचे अधिकाधिक सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सभासदत्व द्यावे.
मोर्फा स्थापन करून शेतकरी एकत्र येत आहेत. त्यांनी पिकवलेल्या सेंद्रिय शेतमालाचे पहिले विक्री केंद्र मगरपट्टा हडपसर येथे सुरु करण्यासाठी सतीश मगर यांनी विनाभाडे जागा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर पुण्याजवळील नांदेड सिटी या गृहप्रकल्पात सतीश मगर यांनी त्याच तत्त्वावर जागा देण्याचे मान्य केले आहे. ग्रामीण भागातील सेंद्रिय शेती उत्पादक आणि शहरातील ग्राहक यांच्यातील दुवा साधला याबद्दल त्यांचे आभार मानावयास हवे. मगरपट्टा सिटी आणि नांदेड सिटी या वसाहतींमध्ये प्रामुख्याने आयटी क्षेत्रात काम करणारी काही लाखांच्या घरात लोक राहतात. या लाखोंचा ग्राहक वर्ग मोर्फा संस्थेच्या हेल्दी हार्वेस्टसाठी उपलब्ध होईल याचा मला विशेष आनंद आहे.
कार्यक्रमास मा. सौ. प्रतिभा (काकी) पवार, राज्याचे कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, श्री. सतीश मगर, श्री. राजेंद्रदादा पवार, आ. दत्तामामा भरणे, मा.आ. अशोकबापू पवार उद्योजक हणमंत गायकवाड, मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळे, प्रल्हाद वरे आदी मान्यवरांसह राज्यातील शेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते प्रस्ताविक स्वाती शिंगाडे यांनी केले.
Published on: 04 September 2018, 07:12 IST