नवी दिल्ली: भारतीय अन्न महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या तांदुळाच्या अतिरिक्त साठ्यापासून इथेनॉलची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर तसेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी याचा उपयोग होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय जैविक इंधन समन्वय समितीच्या एक बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जैविक इंधना संबंधी राष्ट्रीय धोरण-2018 मधील मसुदा 5.3 नुसार एखादया धान्याचे वार्षिक उत्पादन भरपूर झाल्याने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे त्याचा अतिरिक्त साठा असल्यास, राष्ट्रीय जैव इंधन समन्वय समितीच्या मंजुरीनुसार या अतिरिक्त धान्याचे रूपांतर इथेनॉल मध्ये करण्यास परवानगी आहे.
Published on: 21 April 2020, 07:44 IST