News

गेल्या काही दिवसांपासून शिंदे सरकारच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता मोठी बातमी समोर आली असून आता राज्याचे सत्तासंघर्ष प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्यात येणार आहे.

Updated on 11 May, 2023 12:24 PM IST

गेल्या काही दिवसांपासून शिंदे सरकारच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता मोठी बातमी समोर आली असून आता राज्याचे सत्तासंघर्ष प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्यात येणार आहे.

यावेळी माझीच शिवसेना असे कोणीही बोलू शकत नाही, असे महत्वपूर्ण वक्तव्य सरन्यायाधीशांनी केले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला होता. त्यावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सर्वौच्च न्यायालयात दाद मागितली होती.

यावर आज मोठा निकाल आला आहे. यामध्ये व्हीप फक्त राजकीय पक्ष देऊ शकतात. असेही सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करायला हवी होती, भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे देखील म्हटले आहे.

यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आज निर्णय जाहीर केला जात असल्याने शिंदे सरकार जाणार की राहणार? राष्ट्रपती राजवट लागू होईल का? याबाबत कालपासून तर्क वितर्कांना उधाण आले होते.

तसेच राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती. असेही म्हटले आहे. यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

English Summary: Supreme Court shock to Shinde group, big development in power struggle case..
Published on: 11 May 2023, 12:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)