नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ एक हजार 883 गावात 1926 गटांमधील जवळ जवळ 26 हजार 734 शेतकऱ्यांच्या बांधावर 4417 क्विंटल बियाणे आणि सहा हजार692.44 मेट्रिक टन रासायनिक खतांचा पुरवठा झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. कृषी विभागाने मागील वर्षापासून शेतक-यांच्या बांधावर खत आणि बियाणे पोचवण्याचा उपक्रम सुरू केला आहे
कारण कोरोनामुळे दुकानांमध्ये गर्दी होऊ नये आणि शेतकऱ्यांना हवे ते खत मिळावे हा त्यामागचा उद्देश आहे. मागच्या वर्षीही अनेक शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला होता.यावर्षीही कृषी विभागाने हा उपक्रम सुरू ठेवला आहे. ज्या शेतकऱ्यांना खते आणि बियाणे घ्यायचे आहेत त्या शेतकऱ्यांनी गावातील दहा ते बारा शेतकऱ्यांच्या गटाने मागणी नोंदविल्यानंतर त्यांना हवे ते दुकानदाराकडून खत आणि बियाणे घेता येत असूनते बांधावर पोहोच केले जाते.यासाठी शेतकऱ्यांच्या दहा-पंधरा शेतकऱ्यांच्या गटानेमागणी नोंदवणे आवश्यक असते.
या सगळ्या योजनेत दुकानदार आणि शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थाची भूमिका ही कृषी विभाग बजावत असतो. याबाबतचा संपूर्ण व्यवहार हा शेतकरी गटाकडून पूर्ण केला जातो.. या उपक्रमाचा फायदा असा कीहंगामाच्या वेळी शेतकऱ्यांची धावपळ होत नाही.त्याचबरोबर आर्थिक बचत हीहोत असते.तसेच आवश्यक असलेले खतही सहज उपलब्ध होत असते. जिल्ह्यातील 26 हजार 734 वेगवेगळ्या पिकांच्या बियाण्यास पुरवठा करण्यात आला.
सर्वाधिक मकाबियाण्याला असून 215 क्विंटल मका,, 934.65 क्विंटल सोयाबीन, 972.76 क्विंटल भात व 337 क्विंटल इतर पिकांच्या बियाण्यांचा पुरवठा करण्यात आलाआहे.याशिवाय तीन हजार 109 कापूस बियाण्यांच्या पाकिटांचे पुरवठा करण्यात आला आहे. खतांचाही तालुकानिहाय पुरवठा करण्यात आला असून2284 मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा करण्यात आल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. या उपक्रमातील सर्वाधिक लाभ सटाणा तालुक्यातील शेतकर्यांनी घेतला आहे.
Published on: 21 June 2021, 12:48 IST