सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे आणि हीट स्ट्रोक हे त्याच्याच एक परिणाम आहे. वाढणाऱ्या उन्हामुळे मानवी आरोग्यावर बरेसचे दुष्परिणाम होतात, जसे कि निर्जलीकरण (डिहायड्रेशन), चक्कर येणे, थकल्या सारखे जाणवणे . ह्या सगळ्या दुष्परिणामांचा आपल्या नियमित कामांवर विपरीत प्रभाव होतो. वाढणाऱ्या तापमानाचा सामना करण्यासाठी ह्या हंगामात विविध थंड पदार्थांचे तसेच फळांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते. ह्या थंड पदार्थाना तसेच फळांना सुपर कूल फूड्स असे संबोधाले जाते यांच्या नियमित सेवनाने उन्हाळ्यात होणारे त्रास कमी होतात.
सुपर कूल पदार्थांमध्ये मौसमी फळे जसे काकडी, टरबूज, खरबूज, लिंबू तसेच पारंपारिक भारतीय ग्रीष्मकालीन पदार्थांचा समावेश होतो. टरबूज हे ग्रीष्मकालीन हंगामी कमी कॅलोरी आणि असंख्य फायदे असलेला फळ आहे. यात व्हिटॅमिन ए, बी 6 आणि सीसारख्या जीवनसत्त्वे तसेच लाइकोपीन आणि एमिनो ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. यासह मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम व झिंक हि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. ह्या ऋतूत नियमित टरबुजाचे सेवन केल्याने आरोग्याच्या दृष्टीने बरेच फायदे होतात.
टरबूज सेवनामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो, महत्वाचे इलेक्ट्रोलाइट् असल्यामुळे निर्जलीकरण प्रतिबंधित करण्यास मदत होते. लायकोपेन जास्त प्रमाणात असल्यामुळे हृदयरोग रोखण्यास मदत होते. व्हिटॅमिन सीसह अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्त्रोत असल्यामुळे कॅन्सर होण्याचा धोखा कमी होतो. पाचनतंत्र निरोगी ठेवण्यास मदत होते. तसेच काकडी एक कमी कॅलोरी परंतु अनेक महत्वाचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले सुपर कूल फळ आहे. या फळाला आदर्श आणि थंड हैड्रेटिंग फूड मानले जाते. काकडीत विविध पौष्टिक तत्वे जसे कि पोटॅशियम, फायबर आणि विटामिन बी, व्हिटॅमिन सी असतात. यासह "व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन ए अल्प प्रमाणात आढळतात.
काकडीचे काप सॅलेड बनविण्यासाठी वापरले जातात तसेच काकडीचा स्नॅक फूड म्हणून हि उपयोग होतो. काकडीत भरपूर प्रमाणात पाणी आणि द्राव्याचे फायबर असल्यामुळे शरीराचे हायड्रेशन होण्यास मदत होते. लिग्नन्स पॉलीफेनॉल्स असल्यामुळे स्तन, गर्भाशयाचे, डिम्बग्रंथी आणि प्रोस्टेट कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. यात असलेले बी विटामिन जसे कि व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 5 आणि व्हिटॅमिन बी 7 (बायोटीन) तणाव हाताळण्यास मदत होते. काकडीचा वापर आपल्या पाचन आरोग्यास समर्थन देतो.
तसेच लिंबूमध्ये व्हिटॅमिन क भरपूर प्रमाणात असतो या फळाच्या रसाला असलेली विशिष्ट आंबट चव त्यास पेय पदार्थांचा एक प्रमुख घटक बनवितो तसेच लिंबूत विविध जीवनसत्त्वे, आवश्यक तेले आणि अँटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात आढळतात. नियमित सेवन आरोग्यास हितकारक असतो. लिंबू सेवनामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. हायड्रेशनसाठी प्रोत्साहन, पचनासाठी सहाय्य होते. मुतखडा प्रतिबंधीत होतो. वजन कमी करण्यास मदत होते .हे सुपर कूल फळे वेगवेगळ्या स्वरूपात खाल्ले जातात परंतु प्रामुख्याने उपभोग ताजे पेय या स्वरूपात होतो. पेयच्या स्वरूपात सेवन केल्याने तात्काळ उर्जा मिळते. हे पेय सर्वोत्तम तहान तृप्त करणारे असतात. गरम उन्हाळ्याचा आनंद घेण्यासाठी या सुपरकूल फळांचे पेय एक चांगला निरोगी परिपूर्ण उपाय आहे.
डॉ. प्रीती ठाकूर आणि डॉ. रोजी वाघमारे
सहाय्यक प्राध्यापिका शासकीय अन्नतंत्र महाविद्यालय, यवतमाळ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
Published on: 03 March 2022, 12:39 IST