गेल्या काही वर्षात शेतीमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. तंत्रज्ञान, हवामान यामध्ये मोठे बदल झाले आहेत. असे असले तरी शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. असे असताना काही शेतकरी मात्र बाजारभावाची सगळी माहित घेऊन चांगली शेती करून मोठे उत्पन्न कमवतात. यामध्ये आता एक आधुनिक पद्धतीने सूर्यफूल पिकवून चांगले उत्पन्न अनेक शेतकरी घेत आहेत. योग्य नियोजन, बाजारभावाचा अंदाज तसेच रानाची चांगली मशागत केली तर यामधून चांगले उत्पन्न आपल्याला मिळेल. अलीकडच्या काळात चांगले बाजारभाव मिळत असल्याने अनेकांनी लाखो रुपयांचा फायदा यामधून कमवला आहे.
सूर्यफूल हे कोणत्याही हंगामात घेतले जाणारे पीक आहे. ज्या पद्धनीने आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असेल, आणि रानाची देखील उपलब्धता असेल यावरून आपण कधीही हे पीक घेऊ शकतो, केवळ पावसाळ्यात हे पीक काढायला येणार नाही याची दक्षता घ्यावी, त्या पद्धतीने सूर्यफूल लागवड करावी. चांगले उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित आणि संकरित जातीचे बियाणे योग्य प्रमाणात वापरावे. तसेच याची लागवड करत असताना जास्त दाटी होणार नाही याची देखील काळजी घ्यावी, नाहीतर त्याची योग्य अशी वाढ होणार नाही.
हे पीक रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देत असल्याने संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सूर्यफुलास नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सल्फर या अन्नद्रव्यांची गरज आहे. असे असले तरी त्याचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे. त्याचा जास्त वापर देखील हानीकारण ठरतो. यामुळे पिकाच्या गरजेप्रमाणे त्याचा वापर करावा. सूर्यफूलाची उत्पादकता वाढविण्यासाठी पूर्वमशागत, योग्य जमिनीची निवड, सूर्यफूलाच्या सुधारित व संकरित जातीचा वापर, वेळेवर पेरणी, प्रतिहेक्टरी बियाणे वापर, पेरणी अंतर, संतुलित खते याचा वापर केला तर यामध्ये चांगले उत्पादन मिळेल.
तसेच पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत कीड व रोग या सर्व गोष्टींची काळजी घेतल्याने सूर्यफूल उत्पादनात होते वाढ होते. खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून सूर्यफुलास प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्रात तेलबियामध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूलाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यामुळे कमी दिवसाचे हे पीक आपल्याला चांगले पैसे देऊन जाईल, यामुळे शेतकऱ्यांसाठी हे एक पीक फायदेशीर आहे.
Published on: 20 January 2022, 11:03 IST