News

सुर्यफुल हे महत्वाचे तेलवर्गीय पिक आहे. खरीप ,रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक असून हे पिक कमी कालावधीत येते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच सुधारित वाणांचा वापर करून शेतकरी सुर्यफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमा

Updated on 23 October, 2023 4:25 PM IST

सुर्यफुल हे महत्वाचे तेलवर्गीय पिक आहे. खरीप ,रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक असून हे पिक कमी कालावधीत येते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच सुधारित वाणांचा वापर करून शेतकरी सुर्यफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेवू शकतात.

जमीन -
सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. हे पिक आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन ते तीन पाळ्या घ्याव्यात.

पेरणीची वेळ -
रब्बी हंगामात ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी शक्यतो टोकण पद्धतीने करावी. उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये पेरणी करावी.

संकरित वाण -
एनएच-१, बीएसएस-११, एपीएसएस-११. सुधारित वाण : शारदा, आनेगीरी, नारी-६, परभणी कुसुम, परभणी-80, एसएस.५६ मॉडर्न, सुर्या, सनराइज सिलेक्शन, भानु, पिकेव्हीएसएच-२७, पिकेव्हीएसएच-९५२, केबीएसएच-१, केबीएसएच-४४, डिआरएसएच-१, एमएसएफएच-८, एमएसएफएच-१७, फुले रविराज, एलएसएफएच-१७१,

आंतरपीक -
आंतर पीक पद्धतीमध्ये भुईमूग + सूर्यफूल पेरणी करावी.
पेरणीचे अंतर मध्यम ते खोल जमीनीसाठी ४५ x ३0 सें.मी.अंतर ठेवावे
भारी जमिनीसाठी ६0 × ३0 सें.मी.अंतर ठेवावे
संकरित वाणसाठी 60 × ३0 सें.मी. पेरणीचे अंतर ठेवावे.

रासायनिक खते -
पेरणीपूर्वी प्रती हेक्टर २.५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतामध्ये चांगले मिसळावे, बागायती पिकास हेक्टरी ६० किलो नत्र, ३0 किलो स्फुरद व ३0 किलो पालाश द्यावे. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी गांडूळ खत, शेणखत अथवा कंपोस्ट खतातून द्यावे.

English Summary: Sunflower cultivation technology and improved varieties know detailed information
Published on: 23 October 2023, 04:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)