News

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या उन्हाळी कांदा फेब्रुवारी महिन्यापासून चाळीमध्ये साठवून ठेवलेला होता. सगळ्या प्रकारचे देखरेख व्यवस्थापन व्यवस्थापनावरील खर्च या सगळ्या गोष्टी करून सुद्धा शेतकर्यां च्या पदरी निराशाच पडली आहे. अगोदरच यावर्षी झालेल्या जास्त पावसामुळे तसेच हवेतील जास्त प्रमाणात आद्र्रता यामुळे उन्हाळी कांदा अगोदरच सडला होता.

Updated on 06 January, 2022 10:20 AM IST

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या उन्हाळी कांदा फेब्रुवारी महिन्यापासून चाळीमध्ये साठवून ठेवलेला होता. सगळ्या प्रकारचे देखरेख व्यवस्थापन व्यवस्थापनावरील खर्च या सगळ्या गोष्टी करून सुद्धा शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली आहे. अगोदरच यावर्षी झालेल्या जास्त पावसामुळे तसेच हवेतील जास्त प्रमाणात आद्र्रता यामुळे उन्हाळी कांदा अगोदरच सडला होता.

त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता उन्हाळी कांद्याची आवक देखील थांबले असून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पिंपळगाव सारख्या मोठ्या बाजारपेठेत देखील उन्हाळी कांद्याची आवक जवळजवळ थांबले आहे. यावर्षी पूर्ण हंगाम गेला तरी कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले.

 अगोदरच निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असताना बाजारपेठेत देखील कांद्याचे भावा बद्दल चे सगळ्या प्रकारचे अयोग्य सूत्रांवर देखील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

कांदा काढणी यापूर्वी गारपीट आणि मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून आवक  बघून त्याची टप्प्याटप्प्याने विक्री केली.परंतु एवढे करूनही शेतकऱ्यांच्या हाती मात्र अपेक्षित उत्पन्न आले नाही. ऑगस्टपासून वातावरणातील बदलामुळे साठवलेला कांदा सडला. आता उन्हाळी हंगामात हा कांदा संपत आला आणि मग भावात सुधारणा होत आहे हे विशेष. यावर्षीचा सगळा कांद्याचा हंगाम  शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरला आहे. कांदा पीक म्हटले म्हणजे अगदी बेभरवशाचे पीक आहे.यासाठी सरकारने कांद्याबद्दल एक निश्चित धोरण ठरवणे फार गरजेचे आहे. 

शेती करताना खर्च तर कुठल्याही परिस्थितीत कमी होत नाही त्यात वाहतुकीच्या अडचणीमुळे तसेच कधी दर वाढतात तर कधी कमी होतात अशा परिस्थितीत दरात सातत्य राहणे  फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागतो. उन्हाळी कांद्याची एवढे कष्ट करून आठ महिने साठवणूक केली आणि वातावरणातील बदल आणि अवकाळी मुळे कांद्याचे नुकसान अधिक झाले आहे.आता साठवणुकीत ला  उन्हाळी कांदा अंतिम टप्प्यात आहे. सरकारने आपली धोरणे बदलून  शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांची ही आर्त हाक निगरगट्ट सरकारला कधी समजेल देव जाणे.

English Summary: summer storage onion finish but onion rate not growth farmer worreid
Published on: 06 January 2022, 10:20 IST