News

Suicide Mantralaya: मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशी या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Updated on 17 November, 2022 4:38 PM IST

Suicide Mantralaya: मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशी या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी ( A youth attempted suicide in Mantralaya in Mumba ) मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच तरुणाने सहाव्या मजल्यावरुन उडी मारली. पण सुदैवाने तरुण मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीमध्ये अडकला आणि जीव वाचला. मंत्रालयात याआधीही अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही संरक्षक जाळी बसवण्यात आली होती.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! निम्याचं किमतीत मिळणारं ट्रॅक्टर

हा तरुण वरून पडल्यानंतर जाळीत अडकल्याने त्याचे प्राण वाचले आहे. या घटनेत तरुणाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. बापू नारायण मोकाशी असं या तरुणाचं नाव आहे.

त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबतची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. या सर्व प्रकारामुळे काही काळ मंत्रालय परिसरात गोंधळ उडाला होता.

पीएम किसानच्या 13 व्या हप्त्या पूर्वी आली मोठी बातमी, निर्णय वाचून शेतकरी होणार खूश

यानंतर पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं असून उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं आहे. रुग्णवाहिकेतून नेलं जात असताना त्याला आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं कारण विचारण्यात आलं असता त्याने प्रेयसीवर बलात्कार झाला असून, न्याय मिळाला नसल्याचं म्हटलं आहे. पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.

English Summary: Suicide attempt of youth in Mantralaya
Published on: 17 November 2022, 04:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)