यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरला. अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. तरी त्याला हवे तसे यश मिळालेले नाही.
याच पार्श्वभूमीवर पुढच्या हंगामात देखील ऊसाची उपलब्धता जास्त राहील असा अंदाज धरुन राज्यातील पुढच्या वर्षाच्या म्हणजेच ( 2022 आणि 23 )
ऊस गळीत हंगामाचे नियोजन आता पासून केले जात असून पुढच्या वर्षाचा गळीत हंगामाच्या आक्टोबर पासूनच सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनीगुरुवारी राज्यातील चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कामगारांना अभावी ऊसतोडणी शिल्लक राहू नये, यासाठी गळीत हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच हार्वेस्टर मशीन वापर करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
नक्की वाचा:साखर कारखाने बंद, ऊस अजूनही शिल्लक, आता 'स्वाभिमानी' करणार पोलखोल
काय म्हणाले बाळासाहेब पाटील?
राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीची रीतसर नोंदणी केली नव्हती.
यामुळे राज्यातील उसाच्या क्षेत्राचा अंदाज बांधता आला नाही. परिणामी मराठवाड्यातील पावसाचा प्रश्न निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर मराठवाड्यातील कारखान्यांकडे पाठवून तेथील उसाचे गाळप पूर्ण केले आहे. आता हार्वेस्टर साठी साखर कारखान्यांनी पुढाकार घेण्याच्या सूचना देखील साखर आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
ऊस गाळप हंगाम 2021-22मध्ये 200 पैकी 190 कारखाने बंद झाले असून भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याकडून अद्याप ऊस गाळप सुरू आहे.1320 लाख टन ऊस गाळप,138 लाख टन साखर उत्पादन आणि साखर उतारा 10.40टक्के मिळाला आहे.
इथेनॉल उत्पादन वाढीमुळे वीस लाख टन साखर उत्पादन कमी झाले. वाढविण्यावर भर द्यावा केंद्र सरकारने ऊस तोडणी यंत्र साठी अनुदान योजना सुरू करावी असेही ते म्हणाले.
Published on: 17 June 2022, 10:14 IST