पुणे- महाराष्ट्राच्या विकासात साखरेचं विशेष योगदान आहे. राज्याच्या अर्थकारणाला दिशा देण्याची महत्वाची भूमिका राज्यातील साखर उद्योगाने बजावली आहे. साखरेच्या गौरवशाली इतिहासाला जागतिक पटावर आणण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय (sugar museum) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यात (pune) संग्रहालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता संग्रहालय उभारण्याचा निर्णय विचाराधीन होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्र्यांची समिती:
संग्रहालयाच्या उभारणीसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. पुणे येथील साखर संकुलातील विस्तीर्ण जागेवल प्रस्तावित संकुल उभारले जाईल. साखर संग्रहालयास प्रशासकीय मान्यता देणे, संग्रहालयाचे डिझाईन अंतिम करणे, निधी उपलब्ध करुन देणे, संग्रहालयाच्या बांधकाम विषयक कामकाजाचा आढावा घेणे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक समिती तसेच सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साखर संग्रहालयाच्या प्रत्यक्ष उभारणी कामकाजावर देखरेखीसाठी कार्यकारी समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
Published on: 24 September 2021, 10:30 IST