News

मागील दोन महिन्यात पडलेल्या पाऊसाचा परिणाम फक्त रब्बी किंवा खरीप हंगामावर नाही तर उसाच्या क्षेत्रावर सुद्धा होणार आहे.सध्या शेतकऱ्यांचे लक्ष रब्बी पेक्षा उसाच्या लागवडीवर होणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे उसाची लागवड ९ लाख हेक्टरावर होते. यावेळी पाऊसाने खरीप हंगामात नुकसान केले असले तरी सुद्धा शेतकरी रब्बी आणि उसातून हे नुकसान भरून काढेल त्यासाठी शेतकरी तयारी ला लागले आहेत.पश्चिम महाराष्ट्र मध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते मात्र आता काळानुसार ऊस लागवडीला कोणती मर्यादा राहिलेली नाही कारण मराठवाडा हा दुष्काळी भाग असला तरी सुद्धा तिथे सिंचनाची सोय झाली की ऊस लागवड केली जात आहे.

Updated on 10 November, 2021 1:31 PM IST

डिसेंम्बर मध्ये नवीन लागवड सुरू होईल:

यावेळी फक्त मराठवाडा मधील नाही तर राज्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे साठे भरलेले आहेत त्यामुळे उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ  होईल असा अंदाज  कृषि तज्ज्ञांनी   लावलेला आहे.उसाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य महत्वाचे मानले जाते. उत्तरप्रदेश राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या नंबर अधिक उत्पादन घेण्यात  लागतो. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक सुद्धा  आहे. १५ ऑक्टोबर पासून उसाचा गळीत हंगाम सुरू झाला असल्याने डिसेंम्बर मध्ये नवीन लागवड सुरू होईल असा अंदाज लावला असून शेतकरी वर्गाचा भर उसावरच असणार आहे.

रब्बी पेरणीची टक्केवारी घटली:-

खरीप हंगामाच्या अंतिम टप्यात जोरदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा याचा पेरा वाढेल असा अंदाज लावला होता मात्र नोव्हेंबर तरी उजाडला तरी सुद्धा अजूनही ९ टक्के वर च पेरा आहे. खर तर ऑक्टोम्बर मध्ये एवढा पेरा असतो. यामुळे असे समजत आहे की शेतकरी ऊस लागवडीवर ध्यान देत आहेत तसेच उसासाठी पोषक वातावरण सुद्धा असल्याने जास्त उत्पादन भेटणार आहे

ऊस हे नगदी पीक असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कष्ट करून पीक घेतात. राज्यातील वातावरण सुद्धा उसासाठी पोषक आहे त्यामुळे राज्यातील उसामुळे साखरेचा उतारा ११.४० टक्के एवढा आहे जो की हा उतारा राष्ट्रीय उताऱ्यापेक्षाही अधिक आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील उसाला जास्त मागणी आहे.

English Summary: Sugarcane sweetening will increase this year, affecting rabi sowing
Published on: 10 November 2021, 01:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)