News

शिरूर : बहुतांश शेतकरी शेती परवडत नाही असे बोलतात, पण शिरूर येथील शेतकरी मारुती केरबा कदम यांनी हे वाक्य खोटे ठरवले आहे. मारुती केरबा कदम हे तुकाराम बापू पोटे (मामा) न्हावरे, तालुका. शिरूर, जिल्हा. पुणे यांची शेती करतात. मारुती कदम यांनी अभ्यासू व प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे.

Updated on 03 January, 2023 2:49 PM IST

शिरूर : बहुतांश शेतकरी शेती परवडत नाही असे बोलतात, पण शिरूर येथील शेतकरी मारुती केरबा कदम यांनी हे वाक्य खोटे ठरवले आहे. मारुती केरबा कदम हे तुकाराम बापू पोटे (मामा) न्हावरे, तालुका. शिरूर, जिल्हा. पुणे यांची शेती करतात. मारुती कदम यांनी अभ्यासू व प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे.

मारुती कदम म्हणाले, ऊसाची जात ८६०३२ आहे. या उसाच्या जातीचा रिझल्ट एकरी १२० टन लागला असून ही सर्व शेती मी ड्रीप सिस्टीम मध्ये केलेली आहे. एकरात आडसाली ऊसाची लागवड केली होती. या एक एकरातून त्यांनी १२० टन इतके ऊसाचे विक्रमी उत्त्पन्न मिळवले आहे. एका उसाचे वजन ५ किलो भरले आहे.

ऊस लागवडी नंतरचे नियोजन

बुरशीनाशकाचा, ह्युमिक अॅसिडचा वापर केलेला आहे. प्रत्येक आठ दिवसाला सोलेबल खतांचा वापर केलेला आहे. त्यामध्ये १२:६१ ४ किलो, ००:५० ३ किलो, यूरिया ५ किलो त्यानंतर आठ दिवसांनी मॅग्नेशियम ५ किलो वापरले नंतर बाळ चाळणीला एकरी ३ बॅग रासायनिक खताच्या १ ) यूरिया, २ ) ००:२४:२४ ३ ) सिलिकॉन.

नंतर ४ महिन्यांनी उस बांधणीसाठी रासायनिक खताचा भेसळ डोस वापरलेला आहे. नंतर बांधण्यासाठी रासायनिक खताचा भेसळ डोस वापरलेला आहे. त्याच्यामध्ये परत ५० बॅग कोंबड खताचा वापर केलेला आहे. जमीन भुसभूषित होण्यासाठी ५ लिटर आपण फॉस्फरिक ऍसिड वापरलेले आहे. दर सहा दिवसाला ड्रीप ने पाणी द्यायचे आठ तास महिन्यातून १ पाट पानी दिले आहे. 

उस तोडणी अगोदर दोन महिने जैविक स्लरी एकरी दिलेले आहे. ४ किलो गूळ ४ लिटर ताक ५ लिटर गोमूत्र १ लिटर बॅक्टेरिया म्हणजे जिवाणू अशा पद्धतीने नियोजन केलेले आहे त्याचा हा मला मिळालेला रिझल्ट आहे. या मिळालेल्या रिजल्ट मुळे मी खूप समाधानी आहे. मारुती कदम यांनी एकरी १२० टन उत्पादनापर्यंत मजल मारत राज्यातील शेतकऱ्यांपुढे आदर्श तयार केला आहे.

English Summary: sugarcane production of 120 tonnes per acre in Shirur
Published on: 03 January 2023, 02:49 IST