News

सध्या राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरु आहे. यामुळे उसाच्या बाजारभावावरून सध्या आंदोलन केले जात आहे. अनेक ठिकाणी हे आंदोलन चिघळत आहे. आता पंढरपुरात (Pandharpur) ऊस दराच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. वाखरी इथं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आलं आहे.

Updated on 27 October, 2022 2:08 PM IST

सध्या राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरु आहे. यामुळे उसाच्या बाजारभावावरून सध्या आंदोलन केले जात आहे. अनेक ठिकाणी हे आंदोलन चिघळत आहे. आता पंढरपुरात (Pandharpur) ऊस दराच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. वाखरी इथं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आलं आहे.

पंढपुरात ऊस दर संघर्ष समितीनं मेळावा घेतला होता. यामध्ये ऊसाला 3 हजार 100 रुपयांचा भाव मिळावा. तसेच पहिली उचल 2 हजार 500 रुपयांची मिळावी या अशी मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबत निर्णय होत नसल्याने आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना अज्ञात लोकांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले आहेत.

ऊसदराच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणीही वाहतूक करू नये असे सांगण्यात आले होते, त्यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अडवून गुलाब देऊन ऊस वाहतूक थांबवण्याची विनंती करण्यात येत होती. मात्र, काल रात्री या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

'पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे कमी असतील'

गाडीवरुन आलेल्या तीन ते चार अज्ञातांनी ट्रॅक्टरचे टायर फोडल्याचं कृत्य केलं आहे. ऊस दराच्या या प्रश्नांवर कारखान्यांचे अध्यक्ष आपला राजकीय गट विसरतात, मग शेतकरी या प्रश्नांवर एकत्र का येऊ शकत नाहीत, अशी भावना सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी व्यक्त केली होती. एकत्र येऊन संघर्ष केला तरच शेतकऱ्यांना चार पैंसे मिळणार आहेत.

शेतकऱ्याला दुष्काळात तेरावा महिना! ४ लाखांच्या डाळींबाची चोरी

यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जनहित संघटना, जनशक्तीसह विविध शेतकरी संघटना एकत्र आल्या असून, ऊसदर संघर्ष समितीची स्थापना केली आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात ऊस दरावरून चांगलाच वाद पेटणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
बिग ब्रेकिंग! ई-पीक पाहणीची अट रद्द, शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत..
घामाच्या दामाला योग्य भाव न मिळाल्यास साखर आयुक्तांची खुर्ची जाळू- अतुल खूपसे-पाटील
सरकारी गोदामांमध्ये डाळींचा बफर स्टॉक उपलब्द, किमती राहणार नियंत्रणात, ग्राहक मंत्रालयाची माहिती..

English Summary: Sugarcane price agitation ignited, turned violent in Pandharpur, tractor tires burst..
Published on: 27 October 2022, 02:08 IST