News

मुंबई: राज्यातील ऊस गाळप हंगाम 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून, साखर संघ व विस्मा यांच्या सामाईक शिफारसींबाबत सर्व स्तरावर आढावा घेऊन त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

Updated on 25 September, 2018 9:18 PM IST


मुंबई:
राज्यातील ऊस गाळप हंगाम 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून, साखर संघ व विस्मा यांच्या सामाईक शिफारसींबाबत सर्व स्तरावर आढावा घेऊन त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजन या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची गाळप हंगाम 2018-19 बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सहकारमंत्री सुभाष देशमुख, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा खासदार संजयकाका पाटील, खासदार विजयसिंह मोहिते पाटील तसेच साखर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

साखर संघाच्या शिफारशी तसेच वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आणि राज्य सहकारी बँकेच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारचे धोरण व इतर संबंधित घटकांशी चर्चा करुन आढावा घेऊन लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी राज्यातील साखर उद्योगासंदर्भात सविस्तर माहिती दिली. गतवर्षी संपूर्ण देशात 321.03 लाख टन साखर उत्पादन झाले असून त्यात महाराष्ट्राचा वाटा 107.10 लाख टन आहेत. गाळप हंगाम 2018-19 साठी जाहीर एफआरपी दर हा 10 टक्के बेसिक साखर उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल 275 रुपये असून 10 टक्क्यांपुढे 0.1 टक्के उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल 2.75 रुपये आहे. तसेच 10 टक्क्यांपेक्षा कमी आणि 9.50 टक्क्यांपेक्षा जास्त उतारा असेल तर 0.1 टक्क्यासाठी 2.75 रुपये प्रती क्विंटल व 9.50 किंवा त्यापेक्षा कमी उतारा असल्यास प्रती क्विंटल 261.25 रुपये केंद्र शासनाने 20 जुलै 2018 च्या अधिसूचनेनुसार जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातमी वाचण्यासाठी: महाराष्ट्रात यंदा ऊस गाळप 1 ऑक्टोबर पासून

त्याचप्रमाणे इसेंन्शिअल कमोडिटीज ॲक्ट 1955 अंतर्गत शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार साखर दर निश्चिती 2900 रुपये क्विंटल अशी केंद्र शासनाने ठेवली व साखरेवर जीएसटी 5 टक्के ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत आमदार सर्वश्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आवाडे यांनी साखर संघाच्या विविध मागण्या मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सहकार विभागाचे सचिव आभा शुक्ला, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

English Summary: Sugarcane crushing started from 20th of October
Published on: 25 September 2018, 07:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)