स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आता ऊस दराच्या एफआरपीसाठी आक्रमक झाले आहेत. यामुळे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत यंदाच्या वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस हंगामाची दिशा ठरवण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार आहे.
यामुळे राजू शेट्टी पुढील दिशा ठरवणार आहेत, यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित राहणार आहेत. चार वर्षांपासून एफआरपीचा दर २७०० ते २९०० इतका आहे, मात्र खतांचे वाढलेले दर, मजुरी लक्षात घेता आता एफआरपीची रक्कम वाढवून मिळणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत सरकारने विचार करणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारने एफआरपीच्या रकमेतजी वाढ केली ती तोडणी, ओढणीमध्येच संपते. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या साखरेची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात साखर निर्यात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील चार पैसे मिळाले पाहिजेत. कारखाने जी उपउत्पादने बनवतात, त्याचीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.
कौतुकास्पद! साखर कारखान्याकडून मोठी घोषणा, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर देणार फुकट
त्यामुळे आता वाढीव एफआरपी अधिक किती रक्कम हे १५ ऑक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेत ठरेल. यामुळे आता या ऊस परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे एफआरपीची रक्कम का वाढवून मिळावी यासाठी ९ ठिकाणी 'जागर एफआरपीचा' अभियान घेऊन शेतकऱ्यांना जागरूक केले जाणार आहे.
पीक विम्याची 75 टक्के रक्कम वाटपास सुरू, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळेच पक्ष लुच्चे आहेत, महाविकास आघाडीने एकरकमी एफआरपी न देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला. नव्या सरकारने महाविकास आघाडीचे सर्व निर्णय रद्द केले. यामध्ये एकरकमी एफआरपीचा निर्णय रद्द केला नाही, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकरी संप चिघळला, शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले कांदे, बटाटे
Lumpy: दूध तुटवडा असल्याची अफवा पसरवल्यास कारवाई होणार, दर वाढण्याची शक्यता..
या 3 स्वस्त इलेक्ट्रिक कार्स लवकरच भारतात लॉन्च होणार, बजेट कमी असले तरी टेन्शन नाही...
Published on: 24 September 2022, 02:56 IST