या वर्ष्याच्या सुरवातीलाच केंद्र सरकारने आपल्या देशाच्या आर्थिक संकल्पा मध्ये इथेनॉल विषयीचे सकारात्मक धोरण मांडले आहे. या इथेनॉल च्या धोरणामुळे महाराष्ट्र राज्यातील तसेच अनेक राज्यातील साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे.या आधी बरेच से साखर कारखाने अडचणीत आले होते. या इथेनॉल च्या धोरणामुळे अनेक साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. अर्थातच केंद्र सरकारने इथेनॉल च्या धोरणामुळे साखर कारखान्यांना आता बक्कळ नफा मिळणार आहे.
इथेनॉलची किंमत वाढली:
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने देशाचे जैव इंधन म्हणून 10 टक्के इथेनॉल चे मिश्रण असणारे पेट्रोल बनवण्याचा सूचना केल्या आहेत. त्यामुळं इथेनॉल ची ही संपुर्ण खरेदी साखर करखण्याकडून होणार आहे.तसेच गेल्या महिन्यात सरकारने उसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉल ची किंमत ही चक्क 25 टाक्यांनी वाढवली आहे.एक किलो 500 ग्राम उसातून हे 1 लिटर इथेनॉल तयार होत असते. यालाच आपण कनव्हर्जन रेट म्हणून ओळखत असतो. या इथेनॉल चा दर हा साखर विक्री एवढाच आहे.साखर कारखान्यात साखरेची निर्मिती होण्यासाठी तीन पमहत्वाचे टप्पे असतात. त्यातली पहिल्या टप्प्यात बी ग्रेड मळी तयार करणे. यामध्ये साखरेचा चांगला अंश असतो. त्यामुळं बी ग्रेड मळीपासून साखर तयार करतात आणि पुढं त्यातून सी ग्रेड मळी तयार होते. त्याचा उपयोग सुद्धा साखर बनवण्यासाठी केला जातो.
हेही वाचा:राज्यातील चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा सीडी रेशो घसरला
त्यामुळं इथेनॉल च्या विक्रीमुळे साखर कारखान्याना चांगलाच फायदा मिळणार आहे.इथेनॉल मिश्रणाची सध्याची राष्ट्रीय सरासरी साधारण ४.०२ टक्क्यांवर किंवा त्याच्या आसपास आहे. अनेक वेगवेगळ्या तेल कंपन्यांनी बी ग्रेड मळीपासून निर्मित केलेल्या इथेनॉलसाठी ४८.५ कोटी, तर डायरेक्ट उसाच्या रसा वर प्रक्रिया करून तयार केलेल्या इथेनॉलसाठी १.४८ कोटी लिटर इथेनॉल खरेदीची टेंडर काढली आहेत.
यामुळे साखरेचे उत्पादन हे सरासरी 6 लाख टनाने कमी होईल, असा अंदाज सुद्धा बांधला आहे. आणि दुसरीकडे साखरेचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलमध्ये खूपच कमी प्रमाणात साखरेचे उत्पादन झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर २५ टक्क्यांपेक्षा ही जास्त वाढले आहेत.
Published on: 29 June 2021, 11:33 IST