यावर्षी राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न सध्या चांगलाच पेटला आहे. आपला ऊस जाणार की नाही याची चिंता सध्या शेतकऱ्यांना लागली आहे. ऊस लागवडीला दीड वर्ष होत आली तरी अजूनही उसाला तोड आली नाही. राज्यात अजून २० टक्के ऊस शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. अनेकांनी आपला ऊस देखील पेटवला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
यावर्षी मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. सध्या या विभागातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम राहिलेला आहे.आता यावर उपाय म्हणून साखर आयुक्त कार्यालयाकडून यंदा साखर कारखाने हे 31 मे पर्यंत सुरु राहणार असल्याचे सांगितले गेले आहे. पहिल्यांदाच उसाचा हंगाम हा इतक्या दिवस चालणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असूनही हा निर्णय किती पाळला जाणार हे लवकरच समजेल.
यावर्षी 7 महिने गाळप हंगाम सुरु राहूनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागतो की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. यंदाच्या अतिरिक्त ऊसाचा परिणाम आगामी लागवडीवर होणार आहे. यामुळे पुढच्या लागवडीवेळी शेतकरी हे दिवस आठवेल आणि लागवड कमी होईल अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती काहीशी ठीक आहे. मात्र मराठवाड्यात परिस्थिती वाईट आहे. याठिकाणी अजून मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. यामुळे उसाचे क्षेत्र घटणार हे नक्की. ऊस गाळपाची क्षमता वाढली किंवा मे पर्यंत जरी गाळप सुरुच राहिले तरी उत्पादनात घट आता अटळ झाली आहे. कारण लागवडीनंतर 12 महिन्यांमध्ये ऊसाची तोड होणे गरजेचे आहे. मात्र आता नुकसान होणार आहे.
कारखाने आता 31 मे पर्यंत सुरु राहणार असल्याचे सांगितले गेले आहे. असे असातनाही या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागतो की नाही याबाबत शंका आहे. यामुळे मे अखेरपर्यंत चित्र स्पष्ठ होणार असून याबाबत आता येणाऱ्या काळात ऊस लागवड करताना शेतकरी विचार करतील. काहींनी पाणी होते म्हणून पहिल्यांदाच उसाची लागवड केली आता ऊस घालवताना त्यांना मोठा त्रास झाला. यामुळे आता ऊस लागवड म्हटले की नको रे बाबा असे अनेक शेतकरी म्हणत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा, मात्र कोणाला मिळणार कर्जमाफी? वाचा सरकारचा प्लॅन..
साखर कारखाने शेतकऱ्यांचे मित्र का शत्रू? साखर उद्योगावर सगळ्या प्रश्नासाठी चर्चा सत्राचे आयोजन..
मोदींनी पाठवलेले किसान निधीचे पैसे परत करा, अपात्र असल्यास येईल अंगलट, 'अशी' आहे प्रक्रिया..
Published on: 23 March 2022, 10:21 IST