राज्याचे नवे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी साखरदारांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, आपण सारे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो आहोत. तुमचा साखर कारखाना खासगी असो की सहकारी तुम्हाला कामकाजात आर्थिक शिस्त आणावी लागेल.
सहकारी कारखान्यांनी तर प्रत्येक रुपयाचा हिशेब ठेवावा आणि तो शेतकऱ्यांसमोर मांडावा. तुम्ही गैरव्यवहार टाळण्याची दक्षता घ्या आणि प्रत्येक खरेदीमध्ये पारदर्शकता आणा. देशात सर्वाधिक जास्त व सर्वांत आधी एफआरपी महाराष्ट्रानेच दिली आहे. परंतु शेतकऱ्यांना वेळेत आणि पूर्ण एफआरपी द्यावीच लागेल.
संसदेने कायदा करून ती जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. त्यामुळे १४ दिवसांत एफआरपी दिली पाहिजे. जेथे करारनामे असतील तेथे अटींचे पालन व्हावे.
तसेच वजनकाट्यांच्या अडचणी दूर करा आणि पारदर्शकता आणा. तुम्ही जितकी पारदर्शकता आणाल तितका विश्वास वाढेल. आपला कारखाना लपवालपवी करीत नाही हे दिसले तर तुमचा सभासद शेतकरी व साखर कारखाना यांच्यातील विश्वासाचे नाते वेगाने वाढत जाईल, असेही ते म्हणाले.
जप्त केलेली वाळू घराकुलासाठी मोफत वाटप, महसूल विभागाचा निर्णय..
राज्य सहकारी साखर कारखाने संघ व वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने संयुक्तपणे मंगळवारी येथील एका हॉटेलमध्ये आयोजिलेल्या राज्यस्तरीय परिसंवादाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनो या पद्धतींनी शेतातील भूजल पातळी सुधारू शकते, जाणून घ्या..
टोमॅटोच्या शेतात शेतकऱ्याने बसवले सीसीटीव्ही कॅमेरे, टोमॅटोची चोरी होऊ नये म्हणून लढवली शक्कल..
Published on: 10 August 2023, 09:44 IST