सध्या राज्यात उस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. यासाठी ते राज्यात ऊस परिषदेचे आयोजन करत आहेत. तसेच यामध्ये ते कारखानदारांवर टीका करत आहेत. आता राहुरी येथील परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी यांनी विविध मागण्या केल्या आहेत. तसेच त्यांनी कारखानदारांवर गंभीर आरोप केले आहेत.
ते म्हणाले, साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात. राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन केले जावेत, सर्व साखर कारखान्याच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे. यासंदर्भात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येत्या 7 तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार आहे.
मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी पेक्षा दोनशे रूपये जास्त दर साखर कारखानदारांनी दिले पाहिजेत. तसेच यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देत हंगाम संपल्यानंतर 350 रूपये द्यावेत अशी मागणी राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.
'नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकांची मागणी करणार'
तसेच सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह आता राजू शेट्टी यांनी अहमदनगरमध्येही ऊस परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत शेतकऱ्यांच्या मालाल भाव मिळवून देण्याची मागणी केली.
पीक विमा कंपन्यांनी तालुका स्तरावर उघडली कार्यालये, आता शेतकऱ्यांना होणार फायदा
राहुरी तालुक्याच्या टाकळीमिया येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परीषद संपन्न झाली. यावेळी शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारसह विरोधकांवरही निशाणा साधला आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न अजूनच पेटण्याची शक्यता आहे. सध्या शेतीची खते आणि इतर गोष्टी महाग झाल्या आहेत. यामुळे शेती करणे अवघड झाले आहे.
महत्वाच्या बातम्या;
गव्हाच्या दरात मोठी वाढ! प्रति क्विंटल 900 रुपयांपर्यंत झाली वाढ..
फलोत्पादन शेत्रातल्या योगदानाबद्दल शेतकऱ्यांचा कृषी मंत्र्यांच्या हस्ते सत्कार
चालू आर्थिक वर्षात भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ
Published on: 02 November 2022, 11:19 IST