आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार बघायला मिळत आहेत. आता वाढलेल्या साखर दराचा फायदा भारतीय साखर कारखानदारांनी जलद गतीने घेतला आहे. यामुळे याचा फायदा त्यांना झाला आहे.
यामध्ये त्यांना शासनाने दिलेल्या ६० लाख टन साखर कोट्यापैकी ५५ लाख टन साखरेचे करार झाले आहेत. यामुळे कारखान्यांनी याबाबत आग्रही भूमिका दाखवली. यामुळे ते शक्य झाले आहे.
तसेच राहिलेले जानेवारी महिन्यात दिलेल्या पूर्ण कोट्याचे करार होतील. एप्रिल १५ पर्यंत सर्व करार साखर भारताबाहेर जाण्याची शक्यता आहे. तसेच कारखान्यांनी एक आग्रही मागणी केली आहे.
सध्या चांगले दर असल्याने आणखी निर्यात होण्याकरिता केंद्र शासनाने तातडीने निर्यातीचा दुसरा टप्पा जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे.
कृषी जागरण आणि विजय सरदाना यांनी कृषी सुधारणेसाठी केला सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय बाजारात स्थानिक दरापेक्षा चांगला दर मिळत असल्याने कारखानदारांनी शक्य तितक्या लवकर निर्यात कोटा संपवण्यासाठी प्रयत्न केले. याचा फायदा देखील झाला.
ब्राझीलची साखर भारतीय बाजारपेठेत येण्याअगोदर आपली साखर आंतरराष्ट्रीय बाजारात जावी यासाठी सर्वच कारखान्यांची धडपड सुरू राहिली. याचा चांगला फायदा देखील झाला.
बातमी कामाची! राज्य सरकार 5 लाख शेतकऱ्यांना देणार सोलर पंप, शेतकऱ्यांना होणार फायदा
दरम्यान, यामुळे केंद्राने दिलेल्या लक्ष्यापर्यंत जवळ जवळ कारखाने पोहोचले आहेत. आता यावर्षी उत्पादन किती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्याच्या बाजारपेठेत पोहोचली, किमतीने तोडले सगळे रेकॉर्ड
या तरुण पठ्ठ्याने 150 गाई संभाळून सगळ्या गावची चुलच बंद केली, गावात प्रत्येक घरात दिला मोफत बायोगॅस..
शेतकऱ्यांनो पिके संभाळा! राज्यात अनेक ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता..
Published on: 05 January 2023, 05:13 IST