शुक्रवारी म्हणजेच काल दुपारी सोलापूर पुणे हायवेवर केळी निर्यात केंद्राच्या गोडाऊन ला आग लागली होती. जे की डांबर काढून घेण्याच्या बेकायदेशीर कृत्यामुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. केळीच्या गोडाऊन ला आग लागली असल्यामुळे या दुर्घटनेमध्ये जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समजले आहे. ज्यावेळी केळीच्या गोडाऊन ला आग लागली त्यानंतर काही क्षणातच त्या परिसरात अंधार अंधार पसरला गेला आणि त्या ठिकाणी धुराचे लोट बाहेर पडत असताना दिसत होते. मोठ्या प्रमाणात आगीने पेट धरला असल्यामुळे तेथील परिसरातील तसेच वाहतूक करणाऱ्या लोकांनी वाहतूक थांबवून घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी ही घटना झाली त्या ठिकाणी काल पूर्ण ट्राफिक जाम झाले होते.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार :-
सोलापूर पुणे हायवेवर लागलेल्या केळीच्या गोडाऊन आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. जे की काल धुलिवंदन सण असल्यामुळे सर्व कामगारांना सुट्टी होती. जे की कोणीही गोडाऊनमध्ये नसल्यामुळे जीवित हानीचा प्रकार तर घडला नाही मात्र केळी निर्यात करणाऱ्या नऊ अद्यावत मशिनरी जनरेटरसह अजून काही लागणारे महत्वाचे साहित्य होते ते त्या आगीत जळून खाक झाले आहे. ज्यावेळी हा प्रकार समजला त्यावेळी घटनास्थळी गोडाऊन चे मालक गेले आणि सर्व प्रकार पाहता त्यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली व घटनास्थळी झालेला सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना देऊन तक्रार दाखल केली. टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पोलीस अधीक्षक सध्या याबाबत तपास करीत आहेत. जे बेकायदेशीर डांबर काढत होते त्या उद्योग करणाऱ्यांचा पोलीस दोन्ही बाजूने शोध घेत आहेत.
आढेगाव परिसरात घडली घटना :-
सोलापूर पुणे हायवेवर असलेल्या आढेगाव गावामध्ये ही घटना घडलेली आहे. हे गोडाऊन आहे.नागनाथ दत्तू चव्हाण व अजय नागनाथ चव्हाण या दोघांच्या मालकीचे आहे जे की आहे.नागनाथ दत्तू चव्हाण व अजय नागनाथ चव्हाण हे दोघे मालक बारामतीमधील भवानीनगर येथे राहतात. आहे.नागनाथ दत्तू चव्हाण व अजय नागनाथ चव्हाण यांनी व्यापारी विजय फाळके यांना हे गोडाऊन भाड्याने दिले होते. व्यापारी विजय फाळके हे परदेशी केळी निर्यात करतात.
लाखो रूपयांचं साहित्य जळालं :-
विजय फाळके या व्यापाऱ्याचे या गोडाऊनमध्ये स्वतःच्या मालकीचे नऊ जनरेटरसंच, लाखो पॉलिथिन बॅग व केळी पॅक करून परदेशात पाठवणे योग्य तयार करतात. या गोडाऊन च्या आगीमध्ये केळी पॅक करण्यासाठी लागणारे उच्च प्रतीची बॉक्स तसेच जे कामगार त्या ठिकाणी काम करतात त्या कामगारांचे असलेले प्रापंचिक साहित्य जसे की गॅस सिलेंडर, भांडी साहित्य इत्यादी सर्व जळून खाक झाले आहे. या अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आता पोलीस कसून चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.
Published on: 19 March 2022, 04:08 IST