News

मुंबई- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. विविध राज्यांसह महाराष्ट्रातील यशवंतांनी बाजी मारली आहे. पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये येण्याची किमया महाराष्ट्रातील उमेदवारांनी साधली आहे. देशपातळीवरील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालाला मराठमोळ्या अधिकाऱ्याचा ‘मिडास टच’ लाभला आहे. आयपीएस महेश भागवत (IPS Mahesh bhagwat) यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील विद्यार्थ्यांनी यूपीएससीचे शिखर सर केले आहे.

Updated on 28 September, 2021 10:36 AM IST

बई- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे.  विविध राज्यांसह महाराष्ट्रातील यशवंतांनी बाजी मारली आहे. पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये येण्याची किमया महाराष्ट्रातील उमेदवारांनी साधली आहे. देशपातळीवरील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालाला मराठमोळ्या अधिकाऱ्याचा ‘मिडास टच’ लाभला आहे. आयपीएस महेश भागवत (IPS Mahesh bhagwat) यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील विद्यार्थ्यांनी यूपीएससीचे शिखर सर केले आहे.

कठोर मेहनत, प्रबळ आत्मविश्वास व अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन ही त्रिसूत्री यश संपादन करण्यासाठी महत्वाची ठरते. मात्र, अनुभवींचे मार्गदर्शन प्रत्येक टप्प्यावर महत्वाचे ठरते.  गेल्या काही वर्षापासून आयपीएस महेश भागवत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करित आहेत. UPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी अर्थात मुलाखतीसाठी मोफत मार्गदर्शन भागवत यांच्यामार्फत करण्यात येते. प्रत्यक्ष व व्हॉट्स-अप ग्रूपच्या माध्यमातून मुलाखतीचे बारकावे व मार्गदर्शन केले जाते. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मदतीने भागवत यांनी टीम तयार केली आहे.

 केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2020 मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील 761 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. मूळ बिहारचा आणि आयआयटी मुंबईचा विद्यार्थी शुभम कुमार याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्प्यांत यूपीएससी परीक्षा घेतली जाते.

 

नियुक्त झालेल्या 761 उमेदवारांपैकी 131 उमेदवारांना आयपीएस महेश भागवत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पहिल्या शंभर मध्ये येण्याची किमया देखील यामधील काही विद्यार्थ्यांनी साधली आहे.

 ‘भागवत’ पॅटर्न:

आयपीएस महेश भागवत तेलंगणा राज्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. रचाकोंडा विभागाचे पोलीस आयुक्त आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून भागवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करित असतात. देशभरातील यूपीएससीचे विद्यार्थी त्यांच्या संपर्कात असतात.  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून केले जाते. या ग्रुपमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा सहित देशभरातील अन्य राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

कोण आहेत महेश भागवत?

महेश मुरलीधर भागवत हे मराठी पोलीस अधिकारी आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी हे त्यांचे मूळ गाव. पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळविल्यानंतर ते आयपीएस झाले. भागवतांची 5 सप्टेंबर, 1997 रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे ते मणिपूर-त्रिपुरा केडरमधून आंध्र प्रदेश केडरमध्ये आले. 1 जुलै 2016 पासून ते तेलंगण राज्यात राचकोंडा [हैदराबाद चा पूर्व भाग)चे पोलीस आयुक्त आहेत

English Summary: sucess password of upsc exam maharashtrin officer
Published on: 28 September 2021, 10:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)