शेतकरी बांधव शेतीमध्ये रोजाना नवनवीन तंत्र विकसित करत असतात. पीकपद्धतीत बदल करून शेतकरी बांधव आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतात. मध्यप्रदेश मधील एका शेतकऱ्याने देखील पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय केला. या अनुषंगाने या शेतकरी पुत्राने निळ्या कलरच्या बटाट्याची यशस्वी लागवड केली आहे.
राजधानी भोपालमधील खजुरी कला या गावातील रहिवासी शेतकरी मिश्रीलाल राजपूत यांनी ही किमया साधली आहे. मिश्रीलाल यांनी या निळ्या बटाट्याला नीलकंठ असे नाव देखील दिले आहे. या जातीचे बटाटे आतून सामान्य बटाट्या सारखेच असतात.
हेही वाचा:-आनंदाची बातमी! लवकरच रंगीत कापुस वावरात दिसणार; शास्त्रज्ञांनी केला रंगीत कापूस विकसित
हे बटाटे चवीला उत्कृष्ट आहेत शिवाय यामध्ये असणारे आयुर्वेदिक गुणधर्म मानवी आरोग्याला देखील फायदेशीर असल्याचे सांगितले गेले आहे. या बटाट्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे आपल्या सामान्य बटाट्यापेक्षा लवकर शिजवलेले जाऊ शकतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आढळत असल्याने मानवी आरोग्यासाठी हे बटाटे वरदान सिद्ध होऊ शकतात असा दावा केला गेला आहे.
मिश्रीलाल यांनी या निळ्या बटाट्याची यशस्वी लागवड केली आहे. मात्र असे असले तरी अजून मिश्रीलाल हा बटाटा बाजारात विक्रीसाठी नेणार नसल्याचे सांगितले जात आहे. सर्व्यात आधी मिश्रीलाल या जातीच्या बटाट्याचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून घेणार आहेत आणि मग मिश्रीलाल या बटाट्याची व्यापारासाठी लागवड करणार असल्याचे सांगितले गेले आहे. बटाट्याची ही जात मिश्रीलाल यांनी केंद्रीय बटाटा संशोधन संस्था शिमला येथून आणली आहे.
हेही वाचा:-मानलं भावा! फक्त 10 गुंठ्यात घेतलं टोमॅटोचे रेकॉर्डब्रेक उत्पादन; ऐकून तुम्हीही चक्रवाल
या जातीच्या बटाट्याची वैशिष्ट्ये
नीलकंठ जातीच्या 100 ग्रॅम बटाट्यामध्ये अँथासायनिन मूलद्रव्याचे प्रमाण 100 मायक्रोग्रॅम आणि कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण 300 मायक्रोग्रॅमपर्यंत असते. सामान्य बटाट्यामध्ये 15 मायक्रोग्रॅम अँथासायनिन्स आणि 70 मायक्रोग्रॅम कॅरोटीनोइड्स असतात.
या घटकांना सामान्यतः अँटी-ऑक्सिडंट म्हणतात. अँटिऑक्सिडंट्स शरीरातील अपचनीय घटक अर्थात हानिकारक घटकांचा नाश करतात आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात. यामुळे या जातीचे बटाटे मानवी आरोग्यासाठी विशेष फायद्याचे असणार असल्याचा दावा आहे. मानवी आरोग्यासाठी उपयोगी असल्याने या बटाट्याची बाजारात मागणी देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल.
संबंधित बातम्या:-
खरं काय! मोदी सरकार कृषी कायदे मागच्या दाराने का होईना लागू करेलच; सीताराम येचुरी यांचा गंभीर आरोप
Published on: 21 March 2022, 12:53 IST