News

प्रवीण ठाकरे या शेतकऱ्यांने नवा प्रयोग म्हणून आपल्या कोरडवाहू जमिनीत सफरचंदाचीही लागवड केली आहे. आता एप्रिलच्या या कडक उन्हात त्याच्या बागेतील सफरचंदाची फळधारणा होत आहे.

Updated on 07 April, 2022 10:44 PM IST

शेती व्यवसाय करताना अनेक शेतकऱ्यांच्या हाती निराशा येते. पण शेती व्यवसयाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यावर शेतीत काय पिकू शकते हे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील चहल गावच्या शेतकऱ्याने करून दाखवून दिलं आहे.

प्रवीण ठाकरे या शेतकऱ्यांने नवा प्रयोग म्हणून आपल्या कोरडवाहू जमिनीत सफरचंदाचीही लागवड केली आहे. आता एप्रिलच्या या कडक उन्हात त्याच्या बागेतील सफरचंदाची फळधारणा होत आहे.

हेही वाचा : ऐकलं का, या झाडाला लागतो पैसा, सरकारही देईल धन

विदर्भ तसा दुष्काळी भाग, सध्या रखरखत्या उन्हामध्ये शेताकडेही कुणी फिरकत नाही. पण चहल गावच्या ठाकरे यांनी 35 शेतात विविध फळबागा फुलवल्या आहेत. त्यात त्यांनी बारमाही येणारा आंबा, संत्रा, सीताफळा, कमी उंचीचे नारळ, चिक्कू, स्ट्रॉबेरी, टरबूज अशी फळपीकांची लागवड करून त्या पासून उत्पादन घेत आहेत.

 

दोन वर्षापूर्वी ठाकरे यांनी सफरचंदाचीही लागवड केली आहे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती व्यवसयात त्यांनी अमूलाग्र बदल केला आहे. त्यांची शेती ही कोरडवाहू भागातलीच शेती आहे. त्यांच्या शेतीजवळ ना कोणते धरणं आहे. ना कोणती मोठी नदी. मात्र उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व उत्तम नियोजण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी आपली 35 एकर शेती हिरवीगार केली आहे.

English Summary: Successful cultivation of apples in dry land
Published on: 07 April 2022, 10:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)