News

मुंबई: राज्यात खरीप हंगाम 2016-17 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये खासगी बाजार व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 200 रुपये आणि जास्तीत जास्त 25 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. या योजनेचा लाभ 16 थेट पणन परवानाधारक आणि 11 खासगी बाजार परवाना धारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

Updated on 06 March, 2019 8:09 AM IST


मुंबई
: राज्यात खरीप हंगाम 2016-17 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये खासगी बाजार व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 200 रुपये आणि जास्तीत जास्त 25 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. या योजनेचा लाभ 16 थेट पणन परवानाधारक आणि 11 खासगी बाजार परवाना धारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. मंत्रालयात सोयाबीन अनुदान योजनेमध्ये खासगी बाजार समित्यांचा समावेश करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री. देशमुख म्हणाले, राज्यात खरीप हंगाम 2016-17 मध्ये सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोयाबीनची बाजारातील आवक वाढवून सोयाबीनच्या दरात घसरण झाली होती. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने प्रथमच राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये सोयाबीन विक्री केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 200 रुपये आणि जास्तीत जास्त 25 क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर शासनमान्य खासगी बाजार व थेट पणन परवानाधारक व्यक्ती/संस्था यांचे कामकाज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाप्रमाणेच सुरु असल्याने त्यांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार खासगी बाजार व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अनुदानासाठी शासन निर्णय 10 जानेवारी 2017 नुसार अटी व शर्ती निश्चित करण्यात येणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला अनुदान देण्यासाठी ज्या प्रमाणे नियम लागू केले होते त्याच नियमांचे पालन करण्यात येईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

English Summary: Subsidies for farmers selling soybean in private market committees
Published on: 06 March 2019, 08:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)