तसेच महाराष्ट्र सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी सुरु केलं आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी (माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिकपेरा) हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत असून पाहणी मोबाईल अँप द्वारे बंधनकारक केले असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यासंदर्भात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.गत वर्षीपासून कोरोनामूळे जनसामान्यासह बळीराज्याचे जीवन मेटाकूटीला आले आहे.अश्यात आपल्या परिवाराचे पालन पोषन करायचे कसे ? हा यक्षप्रश्न सर्वासमोर ऊभा ठाकले.असे असतांना यंदाच्या या खरिप हंगामात कसाबसा उभा झाला.रोवणीही केली.निंदण खूरपण सुरु आहे.
असे असतांना शासनाने"ई-पिक पाहणी" अॕप्सच्या माध्यमातून केली पिक पेऱ्याची नोंदणी करण्याच्या सूचना केल्या.ग्रामीण भागात अतीशय त्रासदायक असलेल्या या प्रक्रियेला विरोधही झाला.मात्र यासमोर शासनाच्या योजनेंपासून मुकावे लागणार असल्याच्या भितीने शेतकरीवर्ग त्रास झाला तरी चाचपडत नोंदणी करतांना दिसून येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत डॉ.राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालय, बुलडाणा येथील अंतिम वर्षाचे कृषि विद्यार्थी जयेश इंगळे,शुभम काकडे, सिद्धेश्वर सोनुने,प्रतीक मवाळ यांनी त्यांच्या (ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत)बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड मातला येथे शेतकऱ्यांना ई पीक संदर्भात
शेतकऱ्यांचा थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी अँप कसे डाऊनलोड करावे, मोबाईल अँप कसे हाताळावे, आपली नोंदनी अँप वर कशी करावी, पिकाची माहिती कसी भरावी, फोटो काढताना ला परवानगी देणे, भरलेली माहिती अपलोड करणे, अपलोड केलेली माहिती सर्व का पोहोचली का याची पडताळणी कुठे करायची यासंदर्भात प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखविले व माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या ई- पीक पाहणी प्रात्यशिकसाठी बरेच शेतकरी उपस्थित होते.
तसेच सदर ई पीक पाहणी संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.यु.वाघ ,कार्यक्रम अधिकारी व्ही. एस. गायकवाड,व इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी विद्यार्थ्याने च नाहीतर सर्वच क्षेत्रातील युवकांनी यामध्ये पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना ई पीक पाहणी संदर्भात कोणताही त्रास होणार नाही. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाइल हाताळता येत नसल्याने युवकांची त्यांना मदत होईल.
- जयेश इंगळे,शुभम काकडे, सिद्धेश्वर सोनुने, (विद्यार्थि)कृषी महाविद्यालय बुलडाणा
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 22 October 2021, 07:30 IST