News

सध्या महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस स्ट्रॉबेरी लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाण्यातील स्ट्रॉबेरीने पुणे आणि मुंबईची बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली असून आता चक्क बेंगलोर पर्यंत हीस्ट्रॉबेरी जाऊन धडकली आहे

Updated on 10 January, 2022 5:54 PM IST

सध्या महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस स्ट्रॉबेरी लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाण्यातील स्ट्रॉबेरीने पुणे आणि मुंबईची बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली असून आता चक्क बेंगलोर पर्यंत हीस्ट्रॉबेरी जाऊन धडकली आहे

त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळत आहे. सध्या स्ट्रॉबेरीच्या बाजारभावाचा विचार केला तर 170 ते 180 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे कोटीच्या घरात स्ट्रॉबेरी फळाची आर्थिक उलाढाल होत आहे.

 येथील शेतकरी असलेल्या दमट हवामानामुळे स्ट्रॉबेरी चांगली वाढ होऊ लागल्याने ग्राहकांना तिची भुरळ पडली. येथील स्ट्रॉबेरी गुजरात राज्यामध्ये देखील विक्रीसाठी पाठवण्यात येते.

गुजरातमधील सुरत आणि अहमदाबाद या शहरांमध्ये स्ट्रॉबेरीला भावही चांगला मिळतो. तसेच मुंबई आणि पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हे स्ट्रॉबेरी पाठवण्यात येत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे पुणे आणि मुंबईच्या ग्राहकांच्या पसंतीस ही सुरगाण्याची स्ट्रॉबेरी उतरली असून शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे. 

शेतकरी एकत्र येऊन हामाल बाहेरच्या बाजारपेठेमध्ये पाठवत आहेत. एका कंपनीच्या माध्यमातून दररोज दोन ते तीन टन स्ट्रॉबेरी  मुंबई, पुणे आणि बंगलोर ला पाठवण्यात येत आहे. अगोदर फक्त ज्यूस साठी या कंपनीमार्फत स्ट्रॉबेरीची खरेदी केली जात होती परंतु आता बेंगलोर, पुणे आणि मुंबई या ठिकाणी पाठवला जात आहे. यावर्षी सुरुवातीला 250 ते 300 रुपये बॉक्स असा दर मिळाला होता. आता यामध्ये काहीशा प्रमाणात घसरण झाली आहे.

English Summary: strawberry in surgana nashik district sell in mumbai,pune and banglore
Published on: 10 January 2022, 05:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)