News

उन्हाचा चटका तापदायक होत आहे. वादळी पावसासह गारपीट दणका कायम आहे. आज (ता. १८) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Updated on 18 April, 2023 10:58 AM IST

उन्हाचा चटका तापदायक होत आहे. वादळी पावसासह गारपीट दणका कायम आहे. आज (ता. १८) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

कमाल तापमानात वाढ होत असून, उन्हाच्या झळा असह्य ठरत आहेत. राज्यात उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहे. सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मपूरी, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, जळगाव, धुळे येथे तापमान ४१ अंशांवर होते.

उर्वरीत राज्यात कमाल तापमान ३४ ते ४० अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटक पासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत.

उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज..

आज (ता. १८) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.

राज्यतील महसूल विभागात तब्बल १३ हजार पदे रिक्त, शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना देखील हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहे. तसेच मे महिन्यात देखील पावसाची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने राज्यात थैमान (Weather Update) घातले आहे. तर, मे महिन्यात देखील राज्यात पावसाची शक्यता आहे.

'बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ येतीय यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही'
जगातील सर्वात महागडा आंबा, किंमत आहे 3 लाख रुपये प्रति किलो..
सदाभाऊ खोत यांचा गेटवरून उडी घेत पुणे महानगरपालिकेत प्रवेश, शेतकऱ्याचे वाहन जप्त केल्याने आक्रमक..

English Summary: Stormy rains will continue in the state, farmers should be careful for the next few days..
Published on: 18 April 2023, 10:58 IST