मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात पाऊसाने आपले आगमन केले आहे तर आता थंडीच्या कडाक्यात सुद्धा अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्यामुळे थंडीमध्ये अजूनच वाढ झालेली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत अडकला आहे. यातच पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस आपली हजेरी लावून राज्याला मोठा धक्का देणार असल्याची शक्यता आहे. ढगांचा आणि विजांचा कडाडीचा आवाज ऐकून पुढील २४ तासांमध्ये अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज :
पुढील २४ तासांमध्ये कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली गेली आहे. तसेच आज मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या ११ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. आज सकाळी पासून या ११ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झाले असल्यामुळे पुढील ३ ते ४ तासांमध्ये या जिल्ह्यातील तुरळक भागांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने लावला आहे. दक्षिण गुजरात आणि लगतच्या प्रदेशातील तुरळक भागात पाऊस चालू सुद्धा झाला आहे.
दरम्यान च्या २४ तासात उत्तर आणि लगतच्या मध्य आणि पश्चिम अरबी समुद्रात वारे वाहण्याची शक्यता आहे असे सांगितले आहे. या वाहत्या वाऱ्याचा फटका गुजरात किनारपट्टी ला बसणार आहे याची शक्यता आहे. येईल या २४ तासांमध्ये या वाहत्या वाऱ्याचा परिणाम जाणवणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्याच्या दिवशी महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा पाऊसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. उद्या म्हणजेच सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या २ जिल्ह्यात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज लावलेला आहे.
२३ जानेवारी नंतर राज्यातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडणार असल्याचे सांगितले जात आहे. वातावरणाचा पारा २ ते ३ अंशाने घसरणार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे हवामानात सुद्धा बदल होऊन तापमान कमी होईल आणि थंडीचा जोर वाढेल अशी सर्व प्रकारची येत्या २४ तासात होणारी परिस्थिती भारतीय हवामान खात्याने सांगितलेली आहे.
Published on: 23 January 2022, 06:46 IST