News

सध्या राज्यात उष्णतेची लाट वाढत आहे. जसजसे तापमान वाढत आहे तसतशी राज्यातील विजेची मागणीही वाढत आहे. राज्यात सध्या तीव्र वीजटंचाई आहे. राज्यात लोडशेडिंगच्या संकटामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Updated on 14 April, 2022 11:40 AM IST

सध्या राज्यात उष्णतेची लाट वाढत आहे. जसजसे तापमान वाढत आहे तसतशी राज्यातील विजेची मागणीही वाढत आहे. राज्यात सध्या तीव्र वीजटंचाई आहे. राज्यात लोडशेडिंगच्या (Load shedding) संकटामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोळशाचा (Coal) तुटवडा आणि विजेची वाढलेली मागणी ही कारणे महावितरण (MSEDCL) आणि ऊर्जा विभागाने दिली आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

भारनियमचा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असताना भारनियमन सुरू केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके याचे नुकसान होत आहे. या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty head of Swabhimani Shetkari Sanghatana) यांनी महावितरणसह ऊर्जा विभागावर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकर्‍यांवरच भारनियमन लादले जात आहे. हे थांबवले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

चिंताजनक : महाराष्ट्रात दोन दिवस गारपिटीची शक्यता

राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना आता आठ तासांवरून तीन ते साडेतीन तास वीज मिळत आहे. त्यामुळे उभी पिके डोळ्यासमोर दिसू लागली आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकर्‍यांवरच भारनियमन लादले जात आहे. हे थांबवले नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Prickly Pear : निवडुंगाची लागवड करा; आणि मिळवा लाखोंचा नफा

English Summary: Stop weight regulation for farmers; Otherwise, he will take to the streets, Raju Shetty warned
Published on: 14 April 2022, 10:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)