News

जीएम सोयाबीन पेंडच्या आयातीला दिलेली परवानगी शेतकऱ्यांसाठी हानीकारक असून या निर्णयाचा परिणाम हा सरळ सोयाबीनचे बाजार भाव उतरण्यावर होणार आहे.

Updated on 27 August, 2021 11:49 AM IST

जीएम सोयाबीन पेंडच्या आयातीला दिलेली परवानगी शेतकऱ्यांसाठी हानीकारक असून या निर्णयाचा परिणाम हा सरळ सोयाबीनचे बाजार भाव उतरण्यावर होणार आहे.

 त्यामुळे सोया पेंड आयातीवर बंदी घालावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे.

 या संबंधित विषयाकडे केंद्र सरकारने लक्ष घालावे यासाठी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून याबाबतचा राज्य सरकारच्या भावना कळवले आहेत 24 ऑगस्टला एक अधिसूचना जारी करून देशात बारा लाख टन कुटलेली व जीएम गटातील सोया पेंड आयात करण्यास मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची बातमी पसरताच बाजारातील इतर घटकांनी लाभ उठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोयाबीनचे बाजार भाव प्रतिक्विंटल चक्क 2000 ते 2500 रुपयांनी उतरले आहेत, असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, देशातील प्रमुख तेलबिया पिकांपैकी सोयाबीन  आहे. देशात जवळजवळ 120 लाख हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते व जवळजवळएक कोटी शेतकरी या पिकावर अवलंबून असल्याची आठवण देखील या पत्रात करण्यात आली आहे..

देशात सोयाबीनचे खरिपातील पीक कापणी वर असून या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम थेट पुढील बाजार भावांवर परिणाम करेल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून घेतलेल्या या आयातीचा  निर्णयाचा फेरविचार करून सोया पेंड आयातीवर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

English Summary: stop import of soypend send letter to central gov.by state gov.
Published on: 27 August 2021, 11:49 IST