News

गणवेश शिवणकाम महिलांना देण्यापूर्वी गावाचे मॅपिंग करण्यात आले तसेच महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती गणवेश शिवतात याची संख्या काढून त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे.

Updated on 15 June, 2024 11:23 PM IST

मुंबई : महिलांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक लाभ मिळावा, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळच्या (मविम) बचत गटांकडून शाळेचे गणवेश शिलाई करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व अनुसूचित प्रवर्गातील मुले, तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले, यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.

गणवेश शिवणकाम महिलांना देण्यापूर्वी गावाचे मॅपिंग करण्यात आले तसेच महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती गणवेश शिवतात याची संख्या काढून त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे.

आता शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात गणवेश वाटपही सुरू झाले आहे. या निर्णयामुळे मुलांना गणवेश वेळेत मिळण्यास मदत झाली, तसेच महिलांना मोठ्या प्रमाणत रोजगार प्राप्त होत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

English Summary: Stitching of uniforms by women savings groups for employment generation
Published on: 15 June 2024, 11:23 IST