रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने जनतेचे हाल;संबंधीत विभागाचे दुर्लक्ष
चिखली-खंडाळा म ते एकलारा या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.तर या रस्त्याची खस्ता हालत झाली आहे.विशेष म्हणजे या रस्त्यासाठी मोठा निधी देखील मंजुर आहे.परंतु पावसाळा तोंडावर येवुनही रस्ता रुंदीकरण डांबरीकरण कामास सुरुवात होत नसल्याने नागरीक सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासना विरोधात रोष निर्माण करतांना दिसत आहेत.
नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो.नागरिकांचा नाहक बळी जातो.अनेकांना अपंगत्व येते तरीही प्रशासन मात्र ढिम्म असते पावसाळा लागणार आहे.
तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.यामधे चिखली खंडाळा म ते एकलारा हा रस्ता अनेक खेड्यांना जुळत असल्याने या रस्त्यावरुण वाहनांची नेहमीच ये-जा सुरू असल्याने डांबर उखडून खड्डे पडत आहेत.या मार्गाने माल वाहून नेणारे ट्रक सतत जात असतात.यामुळे रस्त्यावर ठिकठीकाणी छोटे मोठे खड्डे पडले असल्याने प्रवासी वाहने,चारचाकी, दुचाकी व इतर वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची खस्ता हालत झाल्याने या रस्त्यावर आपघात प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे.पावसाळा तोंडावर आला
या रस्त्याच्या कामासाठी मागील वर्षीपासुन निधी देखील मंजुर असुन तो पडुन आहे.
मात्र या कामास सुरुवात होतांना दिसत नाही.तर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत असल्याने
व रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असतांना सुद्धा रस्ताकामास प्रत्येक्षात सुरुवात होतांना दिसत नसल्याने पावसाळ्यात रस्ता सुधारणा कामास सुरुवात करणार का?असा सवाल ग्रामस्थांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी उपस्थीत केला असुन या रस्ताकामास तातडीने सुरुवात करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडुन होतांना दिसत आहे.
मंजुर असलेल्या रस्ताकामास सुरुवात करा किवा खड्डे तरी बुजवा--विनायक सरनाईक
मागील वर्षी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत महाराष्ट्रातील रस्ता सुधारणा कामासाठी निधीची मंजुरात मिळाली आहे.त्यामधे या रस्त्याचा समावेश आहे.रस्ता मंजुर असुनही दोन वेळा या रस्त्यावरील धातुर मातुर खड्डे बुजवण्यात आले परंतु तरीसुद्धा रस्ता सुधारणा कामास सुरुवात झाली नाही.आता रस्त्यावर पुन्हा जागोजागी खड्डे पडले आहेत.राजकीय हस्तक्षेपामुळे हा रस्ता रखडुन पडला असुन या कामास पावसाळ्यापुर्वी सुरुवात करण्यात यावी,किवा खड्डे तरी बुजवावे जेनेकरुण जनतेचे हाल होणार नाहीत.
Published on: 25 May 2022, 09:33 IST