News

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी राज्यसभा मध्ये एका प्रश्नाच्या दिलेल्या लेखी उत्तरात एक बाब समोर आली आहे ती म्हणजे गेल्या सहा वर्षांमध्ये देशातील शेतकऱ्यांच्या थकीत असलेल्या कृषी कर्जामध्ये तब्बल 53 टक्यांंम ची वाढ झाली आहे.

Updated on 17 March, 2022 9:13 AM IST

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी राज्यसभा मध्ये एका प्रश्नाच्या दिलेल्या लेखी उत्तरात एक बाब समोर आली आहे ती म्हणजे गेल्या सहा वर्षांमध्ये देशातील शेतकऱ्यांच्या थकीत असलेल्या कृषी कर्जामध्ये तब्बल 53 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

इंडियन मुस्लिम लीग चे खासदार अब्दुल वहाब यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला लेखी स्वरुपात उत्तर देताना डॉ. कराड यांनी ही आकडेवारी राज्यसभेमध्ये सादर केली. जर त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीचा विचार केला तर या आकडेवारीनुसार 2015 ते 16 या वर्षात शेतकऱ्यांकडील एकूण थकीत कृषी कर्ज आहे सुमारे 12.03 लाख कोटी रुपये होते व 2020 व 21 या वर्षात ते वाढून तब्बल 18.42 लाख कोटीच्या घरात पोचले. या सहा वर्षातच त्यामध्ये 53 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

अशा कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांची संख्या मध्ये देखील वाढ झाली असून ती तब्बल 6.93 कोटी वरून तब्बल 10.21 कोटी झाली आहे.विशेष म्हणजे केंद्र सरकारने या सहा वर्षात कोणत्याही स्वरूपाची कर्जमाफी योजना राबवलेली नाही. केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारची कर्जमाफीची योजना लागू केली नसून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचारत नाही. 

याबाबतीत आरबीआयकडून प्राप्त झालेल्या आणि मंत्र्यांनी सादर केलेल्या माहितीवरून असे दिसून येते की या सहा वर्षांमध्ये कृषी कर्ज दार शेतकऱ्यांचा संख्येतवाढ तर  झालीच परंतु थकबाकी देखील 116 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन यात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे.

English Summary: status of farmer debt in india 53 percent growth in debt of farmer in six year
Published on: 17 March 2022, 09:13 IST