News

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष नसल्याचे शेतकरी नेते राजू शेट्टींनी म्हटलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

Updated on 14 February, 2023 10:17 AM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष नसल्याचे शेतकरी नेते राजू शेट्टींनी म्हटलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान, दिवसा वीज, शेतीपंपाचे वाढीव प्रस्तावित वीज दर, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस, थकीत उसाची एफआरपी, मका, पीक विमा, अतिवृष्टीची भरपाई, तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

याबाबत अनेकदा सरकारकडे मागणी देखील केली गेली होती. थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी करण्याचं सत्र राज्य सरकारनं चालवलं आहे. हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही. बुलढाण्यात शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे.

बैलगाडीतून आले लग्नाचे वऱ्हाड, पारंपरिक विवाह सोहळ्याची रंगली चर्चा

रासायनिक खतांच्या किंमती अवास्तव वाढल्या आहेत. केंद्र सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी कोणत्याही उपायोजना करताना दिसत नाही. राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अन्यथा भारताची अवस्था श्रीलंकेसारखी झाल्याशिवाय राहणार नसल्याचे शेट्टी म्हणाले.

धोनी झाला शेतकरी, तब्बल दोन वर्षांनी पोस्ट करत सर्वांनाच दिला धक्का

शेतकऱ्यांनी अजून किती सोसायचं? ऊस तोडणी मुकादमाकडून शेतकऱ्यांची कोट्यवधी रूपये लुबाडले जात आहेत. बुडवणारे मोकाट फिरत आहेत. पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. कारखाने हात वर करतात. मात्र यामध्ये बळी शेतकऱ्यांचा जात असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो कृषिवाणी समजून घ्या..
शेतकऱ्यांनो मातीचा नमुना घेण्याची अचूक पध्दत, जाणून घ्या..
नियोजन उन्हाळी भुईमूग हंगामाचे

English Summary: Statewide chakka jam for farmers on February 22, Raju Shetty's big announcement
Published on: 14 February 2023, 10:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)