नवी दिल्ली: कृषी तंत्रज्ञान मंच अॅग्रीबाजार सोबत केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक करार केला आहे. या कराराअंतर्गत देशातील शेती क्षेत्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि डिजीटल शेतीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अॅग्रीबाजार आणि कृषी मंत्रालय यांच्यामध्ये एका करारावर हस्ताक्षर करण्यात आलं. ग्रामीण भारतामध्ये डिजीटल शेतीला चालना देण्यासाठी सुरूवातीच्या टप्प्यात तीन राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहेत.
अॅग्री बाजारने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अनुसार केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी अॅग्रीबाजार सोबतचा करार शेतकऱ्यांना एक डिजीटल प्लॅटफॉर्म बनवण्यामध्ये मदत करेल. आम्ही शेती क्षेत्रसोबतच एक आत्मनिर्भर आणि डिजीटल भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं तोमर म्हणाले. भारतीय शेतकऱ्यांचा एक विस्तृत डाटाबेस बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल त्यांना विकासाच्या मार्गावर घेऊन जाता येईल.
भारतीय शेती नव्या डिजीटल तंत्रज्ञानाच्या प्रतीक्षेत आहे. त्या दृष्टीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे असे ते म्हणाले. अॅग्रीबाजारसोबत झालेल्या करारानुसार डिजिटल कृषी मंच विकसित करणे आणि तो कार्यान्वित करणे. यामध्ये शेती, शेतकऱ्यासंबंधी सेवा, पीक लागवड, पीक कापणी, बाजारपेठे बद्दल माहिती, आर्थिक मदत या विषयी बाबींचा समावेश करण्यात आला आहे
तीन राज्यात पायलट प्रोजेक्ट
केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार अॅग्रीबाजार सोबत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. यामध्ये अॅग्रीबाजार कृषी मंत्रालयाला सहकार्य करणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.
या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी डिजीटल इंडियाचा मदत घेतली जात आहे.
प्रतिनिधी गोपाल उगले
Published on: 17 June 2021, 06:45 IST