News

राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी उन्हाळी कांदा लागवड साठी लगबग करत आहेत. राज्यात जवळपास उन्हाळी कांदा लागवड आता अंतिम टप्प्यात आहे. यावेळी उन्हाळी कांदा साठी पोषक वातावरण असल्याने आणि खरीप हंगामात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने राज्याने गेल्या अनेक वर्षाचा उन्हाळी कांदा लागवडीचा विक्रम मोडीत काढत एक नवा उन्हाळी कांदा लागवड विक्रम प्रस्थापित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवडीसाठी पसंती दर्शवली आहे. कृषी विभागाने उन्हाळी कांदा लागवड संदर्भात नुकतीच एक माहिती प्रदर्शित केली आहे, कृषी विभागाच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत 3,96,000 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांदा लागवड केली केली आहे. आतापर्यंत झालेली कांदा लागवड ही उन्हाळी कांदा लागवडीच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 30 January, 2022 1:37 PM IST

या उन्हाळी हंगामात जवळपास 25 टक्के अधिक उन्हाळी कांदा लागवड केली गेली आहे. कृषी तज्ञांच्या मते, या हंगामात उन्हाळी कांदा साठी मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध आहे तसेच वातावरण देखील उन्हाळी कांद्यासाठी पोषक असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. गत उन्हाळी हंगामात कांद्याच्या बियाण्याचा मोठा तुटवडा होता, तसेच बाजार भावात देखील मोठी मंदी होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गत हंगामात या हंगामापेक्षा उन्हाळी कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण कमी होते. गत हंगामात कांदा बियाण्याची होणारी ओरड कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात घेतली आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कांदा बीजोत्पादन करून ठेवले. या खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील इतर पिकांसमवेतच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या नुकसानीची भरपाई भरून काढण्यासाठी कांदा या नगदी पिकाची रब्बी हंगामात लागवड करण्यास प्राथमिकता दर्शवली. 

या हंगामात मुबलक बियाणांचा साठा उपलब्ध असल्याने राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याच्या रोपवाटिका सजवल्या. डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याच्या रोपवाटिका पूर्ण विकसित झाल्या आणि तेथून उन्हाळी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यासमवेतच मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासायला लागली. मात्र असे असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मजूरटंचाई सारख्या भीषण परिस्थितीला मात देत कधी नव्हे ती विक्रमी उन्हाळी कांदा लागवड करून दाखवली. एकीकडे राज्यात उन्हाळी कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे तर दुसरीकडे प्रमुख कांदा उत्पादक राज्य म्हणून ओळख असलेले मध्यप्रदेश राजस्थान व बिहार या हिंदी भाषिक राज्यात देखील मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली गेली आहे.

उन्हाळी हंगामात लावल्या गेलेल्या एवढ्या मोठ्या कांदा पिकाला सुरुवातीलाच बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यासमवेतच संपूर्ण राज्यातील उन्हाळी कांद्याला वातावरणात झालेल्या अमुलाग्र बदलामुळे थ्रिप्स, करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीलाच मोठा खर्च करावा लागत आहे. शेतकऱ्यांना मजुरी टंचाईमुळे कांदा लागवडीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागला आहे, तसेच आता पीकसंरक्षणासाठी देखील हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सुरुवातीलाच शेतकऱ्यांना करावा लागत असल्याने कांद्याचे उत्पादन खर्चात भरमसाट वाढ होणार असल्याचे नमूद करण्यात येत आहे. त्यामुळे आता उन्हाळी कांद्याचे सर्व भवितव्य भविष्यात प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर व उन्हाळी कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावावर अवलंबून असणार आहे. कृषी तज्ञांच्या मते, जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात उन्हाळी कांदा लागवड केली जाणार असल्याने उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात अजून थोडीफार वाढ होणार आहे. राज्यात लावल्या गेलेल्या एवढ्या विक्रमी उन्हाळी कांदा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 'तारतो की मारतो' हा येणारा काळच सांगेल.

English Summary: State's new record in summer onion cultivation; As a result, the market price of onion will be ..
Published on: 30 January 2022, 12:53 IST