राज्यातील आले, लिंबू, द्राक्षे व आंबा आयातीसाठी जर्मनीतील कंपनी उत्सुक असून राज्यातील शेतमाल निर्यातीच्या वाढीसाठी राज्य कृषी पणन मंडळ करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय राज्यातील शेतमाल निर्यातीवर झालेली चर्चा सकारात्मक झाल्याने कृषिमाल निर्यातीला चालना मिळणार असल्याचे दिसत आहे.
या बैठकीला संबंधित कंपनीचे बंगळूर येथील प्रतिनिधी मधू कल्यपुरा मुनिकृष्णाप्पा, पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रोहन उरसळ, पणन मंडळाचे निर्यात व्यवस्थापक शैलेश जाधव, जितेंद्र जगताप, विराज पाटील उपस्थित होते. पणन संचालक सुनील पवार यांनी पणन मंडळाच्या निर्यातविषयक पायाभूत सुविधा नवी मुंबई येथील सुविधा केंद्र, व्हेपर हीट ट्रीटमेंट व भाजीपाला प्रक्रिया केंद्र येथून अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व युरोप येथे होत असलेल्या निर्यातीबद्दल माहिती दिली.
भारत व युरोपियन देशांमधील राष्ट्रीय व्यापार संबंध दृढकरण, जर्मनी कंपनीचे प्रतिनिधी आणि पणन संचालक यांच्यात चर्चा, युरोपियन देशांसह अमेरिकेत हापूस व केशर आंबा आयातीबाबत चर्चा, केळी, मिरची, डाळिंब, स्ट्रॉबेरी निर्यात अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पणन मंडळाच्या सहकार्याने ज्या कृषिमालास युरोपियन देशांत आणि अमेरिका येथे निर्यातीच्या संधी आहेत.
त्या कृषिमालाच्या निर्यातीबाबत कामकाज करण्याची तयारी असल्याचे डॉन लिमन कंपनीचे अँड्रियास शिंडलर यांनी बैठकी दरम्यान सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. सध्या अनेक ठिकाणी शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीही करून यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. यामुळे अनेक निर्णय शासनाला घ्यावे लागतील.
महत्वाच्या बातम्या;
घरात बसुन बांधावरची परिस्थिती कळेल का? जलजीवन मिशनबाबत धक्कादायक वास्तव आले समोर
म्हैस फक्त त्यालाच दूध काढून देते!! मग काय कपाळावर बाशिंग आणि नवरदेव काढतोय म्हशीचं दूध
टोमॅटो आणि पेट्रोलचे दर सारखेच, शेतकरी त्रस्त व्यापारीच मालामाल
Published on: 31 May 2022, 12:49 IST