News

रब्बी हंगामात परत खतांची टंचाई होऊ नये यासाठी राज्य सरकार केंद्राकडे अधिक युरिया खतांची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

Updated on 05 September, 2020 10:31 AM IST


रब्बी हंगामात परत खतांची टंचाई होऊ नये यासाठी राज्य सरकार केंद्राकडे अधिक युरिया खतांची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राज्यातील खरीप हंगामात युरिया खताची टंचाई जाणवली होती. काही ठिकाणी जादा किंमतीत युरिया खतांची विक्री केली जात होती. तर काही ठिकाणी युरिया व्यक्तीरिक्त दुसरे खते शेतकऱ्यांना नाईलाजाने घ्यावी लागत होती, अशी परिस्थिती रब्बी हंगामात होऊ नये यासाठी राज्याने जादा ७ लाख टन खतांची मागणी करण्यात आली आहे.

केंद्राकडे रासायनिक खतांची मागणी नोंदविताना मागील तीन वर्षांमधील विक्रीचा अभ्यास केला जातो. याशिवाय बदलती पीक पद्धती आणि उपलब्ध सिंचन क्षमता देखील विचारात घेतली जाते. राज्यात गेल्या हंगामात २७ लाख ६९ हजार टन खते शेतकऱ्यांनी रब्बीसाठी खरेदी केली होती. यंदा त्यात मोठी वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यामुळे रब्बीसाठी एकूण ३४ लाख ६० हजार टन खतांचा राज्यभर पुरवठा करावा, अशी मागणी कृषी विभागाने केली आहे. चालू खरीप हंगामात केंद्र सरकारने गेल्या हंगामातील एकूण विक्रीच्या तुलनेत खत पुरवठ्यात साडेसहा लाख टनांनी वाढ केली आहे.

गेल्या खरिपात ३३ लाख २७ खतांची विक्री झाली होती. या विक्रीच्या तुलनेत यंदा एकूण मंजुरी ४० लाख टन इतकी आहे. दरम्यान त्यापैकी ३७ लाख २१ हजार टनांचा पुरवठा देखील झाला आहे. वाढीव मागणीनुसार, यंदा १० लाख ४९ टनांऐवजी १२ लाख टन युरिया राज्याला हवा आहे. याशिवाय डीएपी तीन लाख ६० हजार टन हवा आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी केवळ अडीच लाख टन डीएपी खरेदी केला होता. यंदा ही उपलब्धता एक लाख टनाने वाढविण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

English Summary: State's demand for additional seven lakh tonnes of fertilizers from the Center
Published on: 05 September 2020, 10:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)