News

संपुर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला. या काळात अनेकांचे रोजगार गेले, राज्यात असलेले बाहेरील राज्यातील मजुर परत आपल्या घरी परतले आहेत. सध्या अनलॉक करण्यात येत असून टप्प्याटप्पाने शहरे आणि उद्योग धंदे सुरू करण्यात येत आहेत.

Updated on 06 July, 2020 5:00 PM IST

 

संपुर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला. या काळात अनेकांचे रोजगार गेले, राज्यात असलेले बाहेरील राज्यातील मजुर परत आपल्या घरी परतले आहेत. सध्या अनलॉक करण्यात येत असून टप्प्याटप्पाने शहरे आणि उद्योग धंदे सुरू करण्यात येत आहेत. परंतु राज्यात निघून गेलेले कुशल मजुर परत येणार याची शाश्वती नाही. दरम्यान राज्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी राज्य सरकारकडून महाजॉब्स वेबपोर्टल सुरु करण्यात आले आहे.

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे.

अशा  स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे  उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.  रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे अथक प्रयत्न व मार्गदर्शनाखाली  अत्यल्प वेळेत हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

English Summary: state youth get jobs from mahajobs webportal
Published on: 06 July 2020, 04:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)