News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर देखील अनेक राजकीय घडामोडी घडल्या. असे असताना आता शिवसेनेसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Updated on 26 August, 2022 2:21 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर देखील अनेक राजकीय घडामोडी घडल्या. असे असताना आता शिवसेनेसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली आहे. यामुळे आता याचा शिवसेनेसाठी मोठा फायदा होणार आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. इथून पुढे या दोन्ही पक्षांची एक भूमिका राहणार आहे. हे पक्ष आता एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती देखील नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. यामुळे आता निवडणुकीत याचा काय फायदा होणार का हे लवकरच समजेल.

आर्थिक नियोजन करावं ते दादांनीच! कोरोनात अजित पवारांचे अचूक नियोजन, कॅगकडून कौतुक

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की मला आपण एकत्र आल्याचा आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे, असे सूचक वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. संभाजी बिग्रेडने राज्यात अनेक विषयांवर आवाज उठवला आहे, यामुळे याचा नक्कीच फायदा होणार आहे.

धक्कादायक! पतीला परदेशी महिलेसोबत पाहून पत्नीला आला राग, आधी खून आणि नंतर बिर्याणी बनवून..

तसेच ठाकरे म्हणाले, काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे. महाराष्ट्रात आज जे काही घडवलं किंवा बिघडवलं ती महाराष्ट्राची ओळख नाही. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असं काहीजण म्हणतात पण तसं वागत नाहीत, आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या;
शरद पवारांच्या नातीचा परदेशात डंका! युरोपमध्ये घुमणार बारामतीचा आवाज, बातमी वाचून कराल कौतुक..
ई-वाहनांवर सबसिडी योजनेबाबत केंद्राचा मोठा निर्णय, नवीन नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार..
शेतकऱ्यांचा हक्काचा जोडीदार! आज बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा, वाचा या दिवसाचे महत्व..

English Summary: state politics, Shivsena's alliance with Sambhaji Brigade
Published on: 26 August 2022, 02:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)