राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कार परभणी कृषी महाविद्यालयाची कु. रंगोली पडघन हिला जाहीर

Wednesday, 29 August 2018 08:10 AM

महाराष्‍ट्र शासनाचा राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन 2017-18 साठीचा सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कारासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषी महाविद्यालयाची विद्यार्थ्‍यींनी कु. रंगोली अरूण पडघन हिची निवड झाली असुन कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्‍कारासाठी औंढा नागनाथ येथील एम. आय. पी. अन्‍नतंत्र महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा. श्री खाजा अब्‍दुल खदीर यांची निवड झाली आहे.

याबाबत दोघांचा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते दिनांक 28 ऑगस्‍ट रोजी सत्‍कार करण्‍यात आला, यावेळी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, प्राचार्य डॉ. डि एन गोखले, डॉ. पपिता गौरखेडे, श्री. अरूण पडघन, श्री. डोईजड आदी उपस्थित होते. पुरस्‍काराबाबत अभिनंदन करतांना कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यी व कर्मचारी यांचा सन्‍मान हे विद्यापीठासाठी गौरवाची बाब असुन मुलीं विविध क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कार्य करित आहेत. रासेयोनेच्‍या माध्‍यमातुन सामाजिक सेवा करण्‍याची विद्यार्थ्‍यांना संधी प्राप्‍त होते. सदरिल पुरस्‍कार हा रासेयो अंतर्गत नि:स्‍वार्थ भावनेने व निष्‍ठेने समाजाची सेवा करणा-यांना प्रोत्‍साहन मिळावे व त्‍यांचा सेवेचा यथोचित गौरव करण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍य शासनाकडुन देण्‍यात येतो.

NSS volunteer parbhani food technology agriculture राष्ट्रीय सेवा योजना परभणी अन्न तंत्र स्‍वयंसेवक कृषी

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.