राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तसेच पूरग्रस्तांनना 2019चा निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय यापूर्वी झाला असून एनडीआरएफच्या मदत निकषांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल तसेच तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना व बाधितांना उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,2019 यावर्षी राज्य शासन आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने जी मदत केली आहे त्याच धर्तीवर आता ही मदत करण्यात येईल.
तसेच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसाठी काढलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत रिझर्व बँकेची चर्चा करण्यात येईल तसेच रोजगार हमीच्या माध्यमातून या भागात कामांना प्राधान्य देखील देण्यात येईल. पूर परिस्थितीत वाढणारे बॅकवॉटर यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थिती बाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश या राज्यांत बरोबर देखील संवाद व समन्वय साधला आहे.
तसेच धरणांमधील बॅकवॉटर बद्दल योग्य त्या खबरदारी घेण्याचे उपाययोजना सुरू आहेत तसेच पूर बाधित क्षेत्रातील लोकांचे पुनर्वसन योग्य रीतीने व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच या पुनर्वसन धोरणांबाबत सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.(स्त्रोत- सामना )
Published on: 07 September 2021, 01:03 IST