मुंबईसह मुंबई उपनगर आणि राज्यातील १४ जिल्हे अनलॉक करण्यात आले आहेत. मात्र, त्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश नसल्याने या दोन जिल्हयात निर्बंध अजून कायम राहणार आहेत. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई विरार इत्यादी महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांना राज्य सरकारच्या नव्या निर्णयाचा फायदा होणार नाही. तर अनलॉक करण्यात आलेल्या १४ जिल्हांमध्ये नाट्यगृहं, सिनेमागृहं, रेस्टॉरंट्स 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. तर इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम असणार आहे.
यासोबतच 14 जिल्ह्यांतली पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळंही 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. त्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी पर्यटनाचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ठाणे, नाशिकसह उर्वरित 22 जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेचे निर्बंध कायम असतील. रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवासाकरिता लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवासाची मुभा कायम ठेवण्यात आली आहे. तर अनलॉक करण्यात आलेल्या जिल्ह्यांचे निकष पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक, दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक तर पॉझिटिव्हीटी रेट हा 10 टक्क्यापेक्षा कमी असायला हवा या प्रमाणे असणार आहेत.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांसह 14 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्रीपासून म्हणजेच, 4 मार्च रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून राज्य सरकारचा नवा निर्णय लागू झाला आहे. गेली काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्हे आणि शहरांमध्ये रुग्ण संख्येत घट दिसून येत आहे. तर रुग्णसंख्या अगदीच आटोक्यात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे आजपासून 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहे. तर इतर जिल्हयामंध्ये ५० टक्के क्षमतेची अट लागू राहणार आहे.
शासनाच्या या निर्णयाने राज्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर व कोल्हापूर हे जिल्हे निर्बंधमुक्त झाले आहेत. तर या १४ जिल्ह्यांमधील सर्व सरकारी, खासगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास परवानगी, शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी, रेल्वे किंवा बसने प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारक, चित्रपटगृहे , मॉल्स आणि इतर ठिकाणी प्रवेश देताना लसीचे दोन डोस बंधनकारक, मनोरंजन आणि उद्यानं, जलतरण तलाव, वॉटर पार्क यांनाही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी तर लग्नसमारंभ आणि अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवण्यात आले आहेत.
Published on: 04 March 2022, 04:28 IST