औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या पैठण येथील 62 एकर जागेवर सिट्रस इस्टेट स्थापन करण्याची घोषणा 2021- 22चार अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या गोष्टीनुसार नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली.
जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात 39 हजार 370 हेक्टर क्षेत्रावर मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 21 हजार 525 तर जालना जिल्ह्यात 14 हजार 325 हेक्टर छतावर मोसंबी लागवड आहे.त्यामुळे मराठवाड्याच्या दृष्टीने मोसंबीच्या शाश्वत उत्पादनासाठी तसेच फळांवरील प्रक्रिया तसेच मोसंबी निर्यातीसाठीक्लस्टर निर्माण करण्याची गरज लक्षात घेता सिट्रस इस्टेटचीस्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यात येईल.
.त्यासाठी औरंगाबाद कृषी अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली सर्व साधारण व कार्यकारी समितीची स्थापना करण्यात येईल.सविधान नव्याने उभी करण्यासाठी 36 कोटी 44 लाख 99 हजार रुपयांची तरतूद यासाठी लागणारे मनुष्यबळ प्रति नियुक्तीने तसेच बाह्य स्रोतामधून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरण्या सही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सिट्रस इस्टेटचा उद्देश
स्विफ्ट इस्टेटचा उद्देश आहे की मोसंबीची उच्च दर्जाचे कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरुन रोपवाटिका स्थापन करणे,
मोसंबीच्या जातीवंत मातृ वृक्षांची लागवड करणे, मोसंबीच्या शास्त्रोक्त लागवड पद्धतीच्या फळबागा विकसित करणे, शेतकऱ्यांना कीड रोग मुक्त उच्च दर्जाची कलमे किफायतशीर दरात व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे तसेच यासाठी च्या शेतकरी प्रशिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे हा सिट्रस इस्टेटस्थापन करण्या मागील उद्देश आहे. मोसंबी फळ पीक घेणाऱ्या प्राथमिक उत्पादक शेतकऱ्यांचे गट यामध्ये स्थापन करून संघटितपणे यासाठीच या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करण्यात येतील.
Published on: 16 December 2021, 11:43 IST