News

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होऊन या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीचा फटका बसला यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून एनडीआरएफच्या मदत निकषांपेक्षा जवळजवळ दुप्पट मदत पूरग्रस्तांना केली जाणार आहे व एवढेच नाही तर एनडीआरएफचे निकषानुसार पूर्वी दोन हेक्‍टरपर्यंत नुकसानभरपाई दिली जात होती परंतु आता त्यात एक हेक्टरची वाढ करत आता ही मर्यादा तीन एकर पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Updated on 10 August, 2022 6:46 PM IST

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होऊन या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीचा फटका बसला यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला

असून एनडीआरएफच्या मदत निकषांपेक्षा जवळजवळ दुप्पट मदत पूरग्रस्तांना केली जाणार आहे व एवढेच नाही तर एनडीआरएफचे निकषानुसार पूर्वी दोन हेक्‍टरपर्यंत नुकसानभरपाई दिली जात होती परंतु आता त्यात एक हेक्टरची वाढ करत आता ही मर्यादा तीन एकर पर्यंत वाढवण्यात आली आहे.

नक्की वाचा:शेतीच्या विकासाशिवाय देशाची प्रगती शक्य नाही: 'धानुका' ग्रुपचे चेअरमन आर.जी. अग्रवाल

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यभरात जो काही  मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये जवळपास पंधरा लाख हेक्टरचे  नुकसान झाले असून या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी विशेष बाब म्हणून एनडीआरएफचे निकषांपेक्षा दुप्पट मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे.

जर अगोदर आपण एनडीआरएफचे निकषाप्रमाणे मदतीचा विचार केला तर शेतकऱ्यांना हेक्‍टरी सहा हजार आठशे रुपये मदत दिली जात होती परंतु आता राज्य सरकारने यामध्ये वाढ करता नुकसानग्रस्तांना 13 हजार 600 रुपये हेक्टरी मदत देण्याचे जाहीर केले.

नक्की वाचा:मुख्यमंत्रीपद शिंदे गटाला देऊन फडणवीसांनी केली शाळा, महत्वाची खाती भाजपकडेच; वाचा खातेवाटप

मेट्रो प्रकल्पासाठी अतिरिक्त खर्च

 मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले की मेट्रो प्रकल्पासाठी दहा हजार कोटी अतिरिक्त  खर्च करण्यात येणार आहे व या खर्चास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

या मेट्रो प्रकल्पाचा 2019 मध्ये खर्चाचा विचार केला तर तो ते 23 हजार कोटी रुपयांपर्यंत होता परंतु मध्यंतरी लॉकडाऊन आणि कारशेड बाबत निर्माण झालेल्या वादामुळे मेट्रोचे काम रखडले व आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे.

नक्की वाचा:नेहरूंनी प्रयत्नपूर्वक पोलाद वाढविले, शेतीच्या संशोधनावर भर दिला आणि अन्नधान्याचे उत्पन्न केले हे कार्य

English Summary: State goverment declare 13 thousand 600 hundred rupees compansation to flood affected farmer
Published on: 10 August 2022, 06:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)